state of road exhaustion
state of road exhaustion Dainik Gomantak
गोवा

Vasco News : गोवा शिपयार्डसमोरील मुख्य रस्ता खचण्याच्या स्थितीत

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, वास्कोतील गोवा शिपयार्डसमोर राष्ट्रीय मार्गाच्या भूगटार वाहिनी दुरुस्त करताना (सिवरेज) कॉर्पोरेशनने एकदम खालच्या दर्जाचे काम केल्याने मुख्य रस्ता खचण्याच्या स्थितीत आला आहे.

रस्त्याचा एक भाग कोसळण्याच्या स्थितीत असून, जर रस्ता खचल्यास वास्को शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याच वर्षी रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण केले होते.

पण सिवरेज कॉर्पोरेशनने भूगटार वाहिनीचे काम निष्काळजीपणाने केल्याने रस्ता एका बाजूला खचत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला अनेकवेळा रस्त्यावर डांबर घालावे लागले.

परंतु रस्ता खचतच राहिल्याने अखेर सिवरेज कॉर्पोरेशनने रस्ता खोदून भूगटार वाहिनीचे काम हाती घेतले. रस्ता खोदल्याने याचा फटका राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या महिला फुटबॉल सामन्यांना बसू लागला आहे.

या रस्त्यावरून जास्त प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच वास्को शहरात जाण्याचा मुख्य रस्ता असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

रस्ता खोदलेल्या बाजूला गोवा शिपयार्ड कंपनीत कामाला येणारे, कामगार आपली वाहने रस्त्यावरच पार्क करून जात असल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडत आहे. वाहतूक पोलिस राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील चिखली व टिळक मैदानावर सेवा बजावत आहे.

यामुळे अतिरिक्त वाहतूक पोलिसांना गोवा शिपयार्डसमोर वाहतूक नियंत्रणासाठी पाचारण करावे लागत आहे.

वाहतूक पोलिसांना त्रास

गोवा शिपयार्डसमोरील रस्त्याखालील भूगटार वाहिनी दुरुस्त करण्याचे काम एकदम संथ गतीने सुरू आहे. यामुळे काम पूर्ण होण्यासाठी आणखीन तीन आठवडे लागतील, असे दिसत आहे.

जर या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले नाहीतर शहरातील अवजड वाहने व गोवा शिपयार्डमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे एका बाजूचा रस्ता खचला जाणार आहे. वाहतूक पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना खूपच त्रास होत आहे.

आदेशाचे उल्लंघन

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश जारी केला होता की गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असून रस्त्यावर खोदकाम करू नये. परंतु सिवरेज कॉर्पोरेशनने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचे पालन न करता गोवा शिपयार्डसमोरील रस्ता खोदून गुन्हा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT