Teacher Recruitment Canva
गोवा

Teacher Recruitment: कंत्राटी पद्धतीनेच होणार व्यावसायिक शिक्षकांची भरती; मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Goa Directorate of Education: जे व्यावसायिक शिक्षक २०१५ पूर्वी कंत्राटीतत्त्वावर रुजू झालेले आहेत, त्यांनाच कायमस्वरुपी पद्धतीने रुजू करण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Vocational Teacher Recruitment

पणजी: राज्यात विविध उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षकांची नेमणूक ही कंत्राटी पद्धतीनेच केली जाणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केली आहे.

पूर्वी पाच वर्षे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक शिक्षकांना कायमस्वरूपी रूजू करण्याचा निर्णय होता आता त्यात बदल करून कंत्राटी पद्धतीनेच व्यावसायिक शिक्षकांची भरती केली जाणार आहे. जुन्या निर्णयानुसार, ११ ऑगस्ट २०१५ पूर्वी ज्या व्यावसायिक शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने रूजू होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत रूजू करून घेण्यात येणार आहे. २०१५ पूर्वी कंत्राटी पद्धतीने रूजू झालेले एकूण २१ शिक्षक असून ते आता कायमस्वरूपी होतील.

१९९८ साली व्यावसायिक शाखेची सुरूवात करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत सरकारची व्यावसायिक शिक्षणाची उद्दिष्ट पूर्ण झाली आहेत.

२०१६ साली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जे व्यावसायिक शिक्षक पाच वर्षे कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत रूजू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता या निर्णयात बदल करण्याचा निर्णय २८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, जे व्यावसायिक शिक्षक २०१५ पूर्वी कंत्राटीतत्त्वावर रुजू झालेले आहेत, त्यांनाच कायमस्वरुपी पद्धतीने रुजू करण्यात येणार आहे. आता सर्व व्यावसायिक शिक्षकांची भरती ही कंत्राटी पद्धतीनेच केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी अधिसूचनेत म्हटलेआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT