Goa Eelection Dainik Gomantak
गोवा

Goa Eelection: राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचे आदेश जारी

Goa Eelection: 16 आक्‍टोबरला मतदान, तर 18 रोजी मतमोजणी होणार..

दैनिक गोमन्तक

Goa Eelection: जिल्‍हा पंचायतीसाठी रेईशमागूस, दवर्ली आणि कुठ्ठाळी या तीन ठिकाणी 16 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. 18 ऑक्‍टोबरला मतमोजणी होईल. सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने काल पोटनिवडणुकीचा आदेश जारी केला.

पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून उपजिल्हाधिकारी निर्वाचन अधिकारी असतील. काल बुधवारपासून पोटनिवडणूक असलेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. रेईशमागूस जागा इतर मागासवर्गीय ओबीसी (OBC), दवर्ली (सामान्य) आणि कुठ्ठाळी (अनुसूचित जमाती) अशा राखीव असतील.

विधानसभा निवडणूक लढण्यासाठी या जिल्हा पंचायत सदस्यांनी राजीनामा दिली होता. त्‍यात रेईशमागूसचे रुपेश नाईक, दवर्लीचे उल्हास तुयेकर आणि कुठ्ठाळीचे आंतोनियो वाझ यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत तुयेकर नावेली मतदारसंघातून तर वाझ कुठ्ठाळी मतदारसंघातून विजयी झाले होते. परंतु नाईक यांना साळगावात पराभव पत्‍करावा लागला होता.त

निवडणुकीचा तपशील-

* अर्ज भरण्‍याची मुदत: गुरुवार 6 ऑक्टोबर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.

* अर्जांची छाननी: शुक्रवार 7 ऑक्टोबर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.

* अर्ज मागे घेण्‍याची मुदत: शनिवार 8 ऑक्टोबर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.

* रेईशमागूस: (एकूण मतदार 18,467) (मतदान केंद्रे 26)

* दवर्ली: (एकूण मतदार 20,018) (मतदान केंद्रे 26)

* कुठ्ठाळी: (एकूण मतदार 17,034) (मतदान केंद्रे 22)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT