Goa State Cancer Centre Dainik Gomantak
गोवा

Goa Cancer Centre: गोव्याची आरोग्य क्षेत्रात वाटचाल! लवकरच सुरू होणार कॅन्सर सेंटर; पंतप्रधानांनी केले कौतुक

आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे यांनी ट्विट करत राज्यात लवकरच कॅन्सर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

Kavya Powar

Goa State Cancer Centre: राज्यातील वैद्यकीय सुविधांचे पूर्ण देशभरात कौतुक केले जाते. यातच अजून एक भर पडली असून गोव्याचे आरोग्य खाते विकासाच्या दृष्टीने पुढे वाटचाल करत आहे. आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे यांनी ट्विट करत राज्यात लवकरच कॅन्सर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ट्विट करत ते म्हणाले की, "आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. त्यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनामुळे गोव्यात राज्य कर्करोग संस्था आकारास येत आहे. त्यांनी नेहमीच सर्वांच्या आरोग्य सुविधा आणि आरोग्य सेवा यावर भर दिला आहे. आज या प्रकल्पाच्या शुभारंभामुळे, गोव्यातील लोकांना आणि संपूर्ण पश्चिम भागातील लोकांना या राज्य कर्करोग संस्थेच्या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल.

दरम्यान, पंतप्रधानांनी याबाबत गोव्याचे कौतुक केले आहे. केंद्रीय आरोग्य विभाग, गोवा सरकार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमामुळे तळागाळातील प्रत्येक नागरिकाला जगण्याची एक नवी उमेद मिळणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

सेंटरचे काम होताच त्वरित कॅन्सर OPD ही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत राज्य सरकारचे कौतुक करत ते म्हणाले की, "गोवा सरकार नेहमीच वेगवेगळ्या स्तरातील लोकांना बळ आणि सहकार्य देण्याचे काम करत आले आहे; आणि आता यामध्ये आणखी एका यशाची भर पडली आहे. याबाबत गोवा सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक आहे. "

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT