CM Pramod Sawant, SBI Rent  Dainik Gomantak
गोवा

1997 च्या आधीपासून बँक द्यायची 973 रु. भाडे, मुख्यमंत्री सावंतांनी दिला वसुलीचा आदेश; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा..

SBI Rent Issue Goa: स्टेट बँक ऑफ इंडिया जुन्या लेखा संचालनालयाच्या इमारतीत शाखा १९९७ पूर्वीपासून प्रति महिना केवळ ९७३ रुपये भाडे सरकारला देत आली.

Sameer Panditrao

पणजी: स्टेट बँक ऑफ इंडिया जुन्या लेखा संचालनालयाच्या इमारतीत शाखा १९९७ पूर्वीपासून प्रति महिना केवळ ९७३ रुपये भाडे सरकारला देत आली. परंतु ही बँक सरकारी जावई बनल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांना बँकेकडून भाड्यापोटीची २.८६ कोटीची वसुली करण्याचे निर्देश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार येथील जुन्या सचिवालयाच्या मागील जुन्या लेखा संचालनालयाच्या इमारतीत स्टेट बँकेची शाखा आहे. बँक १९९७ पूर्वीपासून सरकारला केवळ ९७३ रुपयेच प्रति महिना भाड्याने देत आहे, असे दिसून आले. भाडेकराराचे नूतनीकरण झालेच नाही.

दरम्यान, १९९७ ते २०२५ या कालावधीत तब्बल ५ वेळा प्लिंथ एरिया (मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ)चे दर बदलण्यात आले. पण एसबीआयचा भाडेदर तसाच राहिला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत राहिला. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्यानुसार दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने बँकेला नोटीस जारी केली आणि भाड्यापोटी होणारी एकूण २.८६ कोटी रुपयांची रक्कम अदा करण्याची सूचना केली. फेब्रुवारीपासून मासिक भाडे १.६५ लाख निश्चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT