Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

Vasco-Belgaum Railway: वास्को-बेळगाव रेल्वे सुरू करा तानावडेंची सभागृहात मागणी

Vasco-Belgaum Railway: वास्को-बेळगाव या मार्गावर दररोज प्रवासी रेल्वे सुरू करावी अशी मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज सभागृहात केली.

दैनिक गोमन्तक

Vasco-Belgaum Railway: वास्को-बेळगाव या मार्गावर दररोज प्रवासी रेल्वे सुरू करावी अशी मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज सभागृहात केली. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्याची गरज त्‍यांनी व्यक्त केली.

राज्यसभा खासदार तानावडे यांनी वरील गरजेवर जोर देऊन, वास्को आणि बेळगावदरम्यान विश्वासार्ह आणि कार्यक्षम रेल्वे कनेक्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली.

गोवा आणि बेळगाव यांच्यातील आर्थिक संबंधांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, या दोन प्रदेशांमधील व्यापार, वाणिज्य आणि वैयक्तिक प्रवास सुलभ करण्यासाठी नियमित आणि अखंड रेल्वेसेवा आवश्यक आहे.

बेळगाव विविध उपक्रमांसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करत असून, गोव्याशी विश्वसनीय वाहतूक दुवा गरजेचा आहे.

असंख्य गोमंतकीय व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय आणि खरेदी यासारख्या विविध कारणांसाठी बेळगाव येथे वारंवार जातात. या मार्गाचे धोरणात्मक महत्त्व ओळखून रेल्वेमंत्र्यांना लोंढा आणि दूधसागर येथे संभाव्य थांब्यांसह दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत विचार करावा. त्‍यामुळे प्रवाशांची कनेक्टिव्हिटी आणि कार्यक्षमता वाढेल असे सांगून त्यांनी दूधसागर धबधब्याच्या पर्यटन क्षमतेवर प्रकाश टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT