Start rice harvest happy satisfactory farmer dainik gomantak
गोवा

Goa News : सत्तरीत भातकापणीला प्रारंभ

समाधानकारक पीक आल्याने बळीराजा सुखावला

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत सध्या भात पिकाची कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरू असून यंदा समाधानकारक पीक मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, यंदा संततधार पावसामुळे काही प्रमाणात भाताला कीड लागली होती.

वाळपई येथील शेतकरी तथा माजी आमदार नरहरी हळदणकर यांनी पारंपरिक शेती जोपासली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र शेतीकामात वावरत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून वेळूस येथील त्यांच्या शेतजमिनीत भात कापणीला सुरुवात झाली आहे. यावेळी तुकाराम हळदणकर म्हणाले, दिवसेंदिवस वाढणारी महागाई तसेच शेतमजुरांचे वेतन शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र, भात शेती करून केलेल्या कामाचे समाधान मिळते. पूर्वजांचा वारसा आम्ही जपला आहे.

मशीनरीचा अभाव :

सरकारच्या कृषी खात्यातर्फे जर भात कापणीवेळी मशीन मिळाले असते तर काही प्रमाणात फायद्याचे झाले असते. कारण मशीनव्दारे एका दिवसाच्या आत भात पिकाची कापणी करता येते. मात्र, मशीन नसल्याने एक दिवसाच्या कामाला सहा दिवस लागले. त्यामुळे त्या कामगारांवर जास्त पैसे खर्च करावे लागले. कृषी खात्याने शेतकऱ्यांना भात कापणीचे मशीन उपलब्ध करावे, अशी मागणी तुकाराम हळदणकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POCSO Case: पॉक्सो, बलात्कार प्रकरणातील 10 वर्षांच्या शिक्षेला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाची गोवा सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

Saptakoteshwar Temple: गोव्याच्या अधिदैवताचे मूळ स्थानी पुनर्स्थापन? श्री सप्तकोटेश्वर-कोटीतीर्थाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात

SCROLL FOR NEXT