Puti Gaonkar  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खाणी सुरू करा, पण कामगारांचे काय?

पुती गावकर: मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यातील बंद खनिज खाणी लीलाव करून पुन्हा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्याने मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे गोवा खाण मंचचे अध्यक्ष तथा कामगार नेते पुती गावकर यांनी स्वागत केले आहे. फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुती गावकर यांनी खाणी सुरू कराच, पण सुरवातीपासून विविध खाण कंपन्यात कामावर असलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेऊन ट्रकवाले, मशिनरीवाले यांना आहे तसे काम द्या, अशी मागणी पुती गावकर यांनी केली आहे.

पुती गावकर म्हणाले की, राज्यातील खनिज खाणी बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे. खाण कंपन्यांनी खाणव्याप्त भागात सुरू असलेल्या काही योजना आणि उपक्रमही बंद केल्याने खाण अवलंबितांसाठी दुष्काळात तेरावा महिना सुरू आहे, त्यामुळे आता लीलावाद्वारे खाणी पुन्हा करून कामगार तसेच इतरांना आहे ते काम देऊन खाणव्याप्त भागातील योजना आणि उपक्रमांचा लाभही खाण अवलंबितांना द्या, असे पुती गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी फटकारले असावे, त्यामुळेच राज्यातील खनिज खाणी शक्य तेवढ्या लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही केली असावी, पण काही का असेना खाणी पुन्हा सुरू होत आहेत, ही खाण अवलंबितांसाठी चांगली बाब असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे गोवा खाण मंचने स्वागत केले आहे. राज्यातील खाण कामगारांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे भेट मागितली आहे, ही भेट त्वरित देऊन चर्चा व्हावी, असेही पुती गावकर म्हणाले.

दरम्यान, लीलावाद्वारे आता त्वरित खाणी सुरू होत असतील, तर एवढा काळ सरकार का थांबले असा सवाल करून सगळं काही केंद्र सरकारच्या हाती आहे, मग खाण अवलंबितांची उपेक्षा का केली असाही सवाल पुती गावकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT