ST Leader Dominic Gaonkar join joins AAP Dainik Gomantak
गोवा

एसटीचे प्रमुख नेते डॉम्‍निक गावकर यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

आम आदमी पार्टीच्या गोव्यातील रोजगार यात्रेला सर्वत्र उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

पणजी: एसटीचे प्रमुख नेते आणि राय येथील जिल्हा परिषदेचे सदस्य डॉम्‍निक गावकर यांनी आपचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे यांच्या उपस्थितीत काल सोमवारी पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना राहुल म्हांबरे म्हणाले, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आपमध्ये सामील होत आहे, हा खरोखरच आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. डॉम्‍निक गावकर हे गोव्यातील एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. राय मतदारसंघात त्यांनी भरीव काम केले असून सलग तीनवेळा त्यांनी ही जागा जिंकली आहे. आपमधील त्यांच्या प्रवेशाने युवकांना आणि आमच्या पक्षाच्या तळागाळातील सदस्यांना मोठी चालना मिळाली आहे.

गावकर हे गोव्यातील अनुसूचित जमाती महामंडळाचे संचालक होते. ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी राय, लोटली आणि कामुर्लीमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेकांना वैद्यकीय आणि शिक्षणात मदत केली आहे. तीनवेळा जि.पं. सदस्‍य असण्याव्यतिरिक्त ते २०१२ मध्ये कुडतरीमध्ये विधानसभा निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी समाजसेवक विल्‍सन लुईस यांनीही आपमध्‍ये प्रवेश केला.

आपच्या रोजगार यात्रेने गोव्यातील तरुणांच्या नोकऱ्या मिळवण्याच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला आहे, असे डॉम्‍निक गावकर म्हणाले. साथीचा रोगामुळे सर्वसामान्य गोमंतकीयांना मोठा फटका बसला आहे. लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गमावले आहेत आणि सरकार याकडे डोळेझाक करत आहेत. शेतकऱ्यांचे हाल होत असूनही शासन त्यांना कापणी यंत्रे देत नाही. त्यामुळे आता वेळ आली आहे, बदल गरजेचे असून बदलासाठी आप एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT