Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier DNA Controversy: वेलिंगकरांना सावंत सरकारची फूस; काँग्रेसचा घणाघात

Goa Congress Criticized Sawant Government: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्‍या पवित्र अवशेषांची जनुकीय चाचणी करण्याची मागणी करून वादात सापडलेले सुभाष वेलिंगकर यांना पळून जाण्यास सरकारनेच मदत केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress News: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्‍या पवित्र अवशेषांची जनुकीय चाचणी करण्याची मागणी करून वादात सापडलेले सुभाष वेलिंगकर यांना पळून जाण्यास सरकारनेच मदत केली आहे, असा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा होते.

निंबाळकर म्हणाल्‍या, एक व्यक्ती बेपत्ता होते आणि पोलिसांना सापडू शकत नाही, असे होऊच शकत नाही. वेलिंगकर यांना राज्याबाहेर, देशाबाहेर पळून जाण्यास सरकारनेच मदत केली आहे. द्वेषपूर्ण विधानांची राज्य सरकारने स्वेच्छा दखल घेतली पाहिजे, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना केवळ एफआयआर नोंदवण्यासाठी सरकार जनक्षोभाची वाट पाहात राहिले. वेलिंगकर यांच्या विधानामुळे सामाजिक दुही निर्माण झाली आहे.

डिचोली पोलिसांनी बजावली तिसऱ्यांदा नोटीस

डिचोली पोलिसांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात धार्मिक सलोखा बिघडवल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता. चौकशीसाठी दोनवेळा नोटीस बजावूनही ते उपस्थित राहिले नव्हते. सत्र न्यायालयाने त्यांना या नोटिशीनुसार चौकशीस सामोरे जाण्याचे तसेच तपासकामात सहकार्य करण्याचे निर्देश देऊनही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तिसरी नोटीस बजावून आज ( १० ऑक्टोबर) सकाळी चौकशीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT