Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Saint Estevam Crime: कारमध्‍ये 'बाशुदेव' नव्‍हताच? 'सांतइस्तेव प्रकरणात' नवीन अपडेट, मुलाच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?

St Estevam Tragedy: कुंभारजुवे नदीत घडलेल्‍या कार दुर्घटनेतून बचावलेली युवती, तिचे मित्र व तिच्या कुटुंबीयांनी मिळून बाशुदेव भंडारी याला बेपत्ता केले आहे का या अंगाने तपासकाम करण्याचे पोलिसांचे आश्‍‍वासन

गोमन्तक डिजिटल टीम

Saint Estevam Goa Crime

पणजी: सांतइस्तेव येथे कुंभारजुवे नदीत घडलेल्‍या कार दुर्घटनेतून बचावलेली युवती, तिचे मित्र व तिच्या कुटुंबीयांनी मिळून बाशुदेव भंडारी याला बेपत्ता केले आहे का, या अंगाने तपासकाम करण्याचे आश्‍‍वासन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर कौशल यांनी बाशुदेवचे वडील नारायण भंडारी यांना आज भेटीसाठी पर्वरी येथील आपल्या कार्यालयात बोलावले होते.

३१ ऑगस्टच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. युवती पोहून किनाऱ्यावर आली होती तर बाशुदेव बेपत्ता झाला होता. परंतु पोहता येणारा बाशुदेव बुडाला हे मानण्यास त्याचे कुटुंब तयार नाही. त्याचे वडील नारायण व बंधू बलराम यांनी काल मुख्यमंत्र्यांची साखळी येथे भेट घेतली होती. त्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला होता.

त्या युवतीने आपण आधी मद्यपान केले नव्‍हते अशी जबानी पोलिसांना दिली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मद्यपान करताना दिसत आहे.

युवतीच्या उपस्‍थितीत दोघांची ओळखपरेड

कार दुर्घटनेतून बचावलेल्या युवतीच्‍या उपस्थितीत तिच्‍या दोघा तरुणांची ओळखपरेड आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी (मामलेदार) घेतली. माशेल येथे ज्या कारला ठोकर देऊन बाशुदेव पसार झाला होता व त्याच्या कारचा पाठलाग केलेल्या दोघा संशयितांना बोलावण्यात आले होते. या ओळखपरेडचा अहवाल सीलबंद ठेवण्यात आला आहे.

कारमध्‍ये बाशुदेव नव्‍हताच?

बाशुदेव, ती युवती व तिच्‍या दोन मित्रांनी हॉटेलमध्‍ये जेवण घेतल्यानंतर कारमध्ये बाशुदेव होता, याचे पुरावे पोलिसांनी द्यावेत म्हणजे तो बुडाला असे मानता येईल असे नारायण यांचे म्हणणे आहे.

मित्रांच्‍या जबानीत विसंगती

त्या दोन मित्रांनी आपण हॉटेलमधून वसतिगृहात गेल्याचे आधी सांगितले होते तर आता ते आम्हीही कांदोळीला निघालो होतो असे सांगत आहेत.

म्‍हणून शिक्षणासाठी गोव्‍यात

बाशुदेवच्या प्रेमाला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळेच तिला गुजरातहून लांबवर गोव्यात शिकण्यासाठी पाठवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT