Investigation Canva
गोवा

St Estevam Accident: मध्यरात्री एक वाजता 'तो' पेट्रोल पंप सुरुच न्हवता; सांतइस्तेव्ह प्रकरणातले गूढ कायम

St Estevam Tragedy: बाशुदेव बेपत्ता प्रकरणाच्या तपास कामाचा दैनंदिन अहवाल द्यावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Incident

पणजी: सांतइस्तेव्ह येथील खाडीत कार गेल्यानंतर बेपत्ता झालेला बाशुदेव भंडारी याचा शोध घेण्यासाठी स्वत: त्याचे वडील नारायण आणि थोरले बंधू बलराम हे सध्या गोव्यात असून त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आजच्या भेटीदरम्यान या प्रकरणाची तपशीलवार माहिती दिली आणि तपास कामात राहिलेल्या त्रुटींवर बोट ठेवले.

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी आपली भेट घेत या प्रकरणात आजवरच्या तपास कामाबाबत माहिती द्यावी, असा आदेश दिला. शिवाय बाशुदेव बेपत्ता प्रकरणाच्या तपास कामाचा दैनंदिन अहवालही द्यावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, साखळी ते सांतइस्तेव्ह प्रवासादरम्यान ती कार पेट्रोल पंपवर मध्यरात्री १ वाजून ४ मिनिटांनी गेली नसल्याचे आजच्या तपासकामात समोर आले आहे. तो पेट्रोल पंप रात्री दहा वाजता बंद होतो. त्यामुळे तेथे पेट्रोल उपलब्ध नव्हते, हेही स्पष्ट झाले आहे. त्या पेट्रोल पंपवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची क्षमता मोठी नसल्याने कार नेमकी कोण चालवत होता, याबाबतची माहिती तेथून मिळालेली नाही. या कारणाने कार नेमकी कोण चालवत होता, याबाबत गूढ कायम राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT