Crime Canva
गोवा

St Estevam Accident: मग फोन उचलला 'कुणी'? पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

St Estevam Incident: आयफोन मोबाईलवर ४ सप्टेंबरला २३ सेकंदांसाठी कोणी प्रतिसाद दिला या प्रश्नाचे उत्तर अद्याप बाशुदेवच्या वडिलांना मिळालेले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam Tragedy

पणजी: सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर ३१ ऑगस्टच्या रात्री कार पाण्यात गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी याच्या आयफोन मोबाईलवर ४ सप्टेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास २३ सेकंदांसाठी कोणी प्रतिसाद दिला, या प्रश्नाचे उत्तर अद्याप त्याच्या वडिलांना मिळालेले नाही. त्यानंतरही एकदा सेकंदभरासाठी त्याच्या मोबाईलवर कोणीतरी प्रतिसाद दिला होता.

बाशुदेवचे वडील आणि भाऊ यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ रोजी बाशुदेव यांच्या प्रेमसंबंधाला तीन वर्षे पूर्ण होणार होती. ते साजरे करण्यासाठी तो एकाला उसने दिलेल्या साडेतीन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये घेऊन विमानाने गोव्यात आला होता. त्याच्यानंतर त्याचा जवळचा मित्र कल्पराज हाही त्याच्या प्रेयसीसह गोव्यात आला होता.

बाशुदेव साखळी येथे, तर कल्पराज कांदोळी येथे राहात होते. त्या चौघांनी मिळून पणजीत कॅसिनोवर २८ रोजी प्रेमाचा वर्धापनदिन साजरा केला. त्यासाठी १४ हजार रुपये खर्च केले. कल्पराज त्याच्या प्रेयसीसह ३१ रोजी दुपारी सुरतला निघून गेला.

त्याच रात्री बाशुदेव आणि कारमधील युवती यांनी पणजीला येण्याचा बेत केला. साखळी आणि माशेलदरम्यान एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण घेतले. त्यावेळी त्या युवतीचे राजस्थान व पश्चिम बंगालमधील दोन मित्र (जे जीआयएमध्येच शिकत आहेत) हेही उपस्थित होते. वसतिगृहावर वेळेवर पोचण्यासाठी ते मोटारसायकलवरून परत गेले, तर बाशुदेव कारमधून पणजीला निघाला.

बाशुदेवची कार सांतइस्तेव फेरी धक्क्याजवळ जात होती, त्यावेळी तेथे एक क्रेटा कार होती. त्या कारच्या मालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बाशुदेवच्या कारमध्ये दोन व्यक्ती होत्या. पुरुष व महिला कारमध्ये असताना मागून आणखी एक कार आली. त्यातून एक-दोघेजण खाली उतरले आणि त्यांनी बाशुदेवच्या कारच्या काचेवर हात मारण्यास सुरवात केली.

त्यावेळी कारमधून बाशुदेव ‘तुमच्या गाडीचे नुकसान झाले असेल तर पैसे देतो, किती नुकसान झाले ते सांगा’ असे म्हणत होता. दुसऱ्या कारमधील लोकांनी ‘तू बाहेर ये’ असाच घोषा लावला होता. त्यामुळे बाशुदेवने कार धक्क्याच्या दिशेने नेली. या वादात कशाला पडा, असे म्हणत क्रेटा कारचालकाने तेथून काढता पाय घेतला, असे बाशुदेवच्या वडिलांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT