sports complex  Dainik Gomantak
गोवा

Quepem Sports Complex Row: कवळेकर अन् एल्टन कार्यकर्त्यांत खंडाजंगी; प्रकरण हातघाईवर

क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर जूंपली; व्हिडिओ व्हायरल

दैनिक गोमन्तक

केपे: आज सकाळी क्रीडा मंत्री गोविंद गावडे हे बोरीमळ केपे येथील क्रीडा संकुलाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या उपस्थितीत केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा व माजी आमदार बाबू कवळेकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर येणार इतक्यात गावडे यांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई देखील हजर होते.

(Sports Minister Govind Gawde inspected the sports complex at Borimol Quepem)

बोरीमळ येथील क्रीडा संकुलात सध्या जॉगिंग ट्रॅकचे काम सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री गोविंद गावडे केपेत आले असता या कामाची निविदा बाबू कवळेकर हे केपेचे आमदार असताना काढण्यात आली होती. यावेळी एल्टन डिकॉस्टा व गावडे यांच्यामध्ये कामाविषयी चर्चा सुरू होती. दरम्यान बाबू कवळेकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता डिकॉस्टा यांनी कवळेकर यांना तुम्ही कोण आहात? असा प्रश्न केला असता कवळेकर यांच्या कार्यकर्त्यांनी डिकॉस्टा यांना याविषयी जाब विचारला.

डिकॉस्टा यांना जाब विचारता डिकॉस्टा यांचेही कार्यकर्ते आक्रमक झाले व कवळेकर व डिकॉस्टा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना गावडे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण बराच वेळ बाचाबाची होत राहिली. अखेर हे प्रकरण हातघाईवर येणार असे वाटत होते. गावडे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने थोड्या वेळाने हे प्रकरण थंडावले.

भाजप व काँग्रेस आमदारांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रकार वाढले

सध्या बऱ्याच ठिकाणी भाजप व काँग्रेस आमदारांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी सुद्धा दोनवेळा एल्टन डिकॉस्टा व बाबू कवळेकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्या आहेत.

कवळेकर आमदार असताना आपण बऱ्याच कामाच्या निविदा काढल्या होत्या व आता ह्या सर्व कामांचे श्रेय डिकॉस्टा घेऊ पाहत असल्याने दोघांमध्ये वारंवार तुतू मै मै होत असते. पण आज कार्यकर्ते सुद्धा आमने सामने येऊ लागल्याने येणाऱ्या चार वर्षात केपेवासीयांना कवळेकर व डिकॉस्टा यांच्यामध्ये आणखी किती युद्धे होणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT