Professional League Football Dainik Gomantak
गोवा

Professional League Football: स्पोर्टिंग गोवाने कुठ्ठाळी व्हिलेजर्सला रोखले; रोहन रॉड्रिग्जचा गोल ठरला निर्णायक

Professional League Football: प्रोफेशनल लीग फुटबॉल: जीनो एफसीची सेझा अकादमीवर निसटती मात

दैनिक गोमन्तक

Professional League Football

सामन्यातील दोन मिनिटांचा खेळ बाकी असताना रोहन रॉड्रिग्ज याने केलेल्या गोलमुळे गोवा फुटबॉल असोसिएशनच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवाने पिछाडीवरून कुठ्ठाळी व्हिलेजर्स सोशल वेल्फेअर स्पोर्टस क्लबला 4-4 असे गोलबरोबरीत रोखले.

रंगतदार ठरलेला सामना बुधवारी बाणावली येथील मैदानावर झाला. शिरसई येथील मैदानावर जीनो एफसीने सेझा फुटबॉल अकादमीवर 2-1 अशी निसटती मात केली. महंमद फाहीज याने नवव्या मिनिटास केलेला गोल,

तसेच सेझाच्या मायरन परेराने 17 व्या मिनिटास केलेल्या स्वयंगोलमुळे जीनो एफसी संघ विश्रांतीला दोन गोलने आघाडीवर होता. 71 व्या मिनिटास जोशुआ डिसिल्वाच्या गोलमुळे सेझा अकादमीने पिछाडी एका गोलने कमी केली. 90+7 व्या मिनिटास जीनो एफसीच्या फाहीज याला रेफरीने रेड कार्ड दाखविले.

उत्कठांवर्धक लढत

बाणावली येथे कुठ्ठाळी व्हिलेजर्सने पूर्वार्धात 2-1 अशी आघाडी घेतली होती. त्यांच्यासाठी रॉनिल आझावेदो याने 18 व्या, तर मायकल डायसने 23 व्या मिनिटास गोल केला. 22 व्या मिनिटास विदिप्त दुआ याच्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लबने पिछाडी कमी केली होती. 48 व्या मिनिटास मार्क कार्व्हालो याने स्पोर्टिंगला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

59 व्या मिनिटास अलिस्टर अँथनीने केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंगला 3-2 असे वर्चस्व मिळवता आले. मात्र डेनिल रिबेलोने 68 व्या, तर व्हेलरॉय कार्व्हालोने 79 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे कुठ्ठाळी व्हिलेजर्सने पुन्हा 4-3 अशी आघाडी मिळविली. अखेरीस 88 व्या मिनिटास रोहनने केलेल्या गोलमुळ स्पोर्टिग गोवाने बरोबरीचा एक गुण प्राप्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT