Spirit of Goa Festival Dainik Gomantak
गोवा

Spirit of Goa Festival: दक्षिण गोव्यात होणार 'स्पिरिट ऑफ गोवा' महोत्सव; विशेष काय ? जाणून घ्या

नारळ आणि काजूच्या फळांपासून बनवलेल्या स्थानिक पदार्थ आणि पेये यांच्यासंबधित 'स्पिरिट ऑफ गोवा' महोत्सव आयोजित करणार आहे.

Pramod Yadav

Spirit of Goa Festival: गोव्यात येणारे पर्यटक नेहमी उत्तर गोव्यात पर्यटनास पसंती देत असतात. त्यामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटनावर त्याचा परिणाम होतो.

त्यासाठी दक्षिण गोव्यात देखील विविध महोत्सव आयोजित केले जाणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी जाहीर केले. त्यानंतर याच महिन्यात दक्षिण गोव्यात 'स्पिरिट ऑफ गोवा' महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

गोवा पर्यटन विभागाच्या वतीने याबाबत माहिती दिली आहे.

गोवा पर्यटन विभाग 21 ते 23 एप्रिल या कालावधीत नारळ आणि काजूच्या फळांपासून बनवलेल्या स्थानिक पदार्थ आणि पेये यांच्यासंबधित 'स्पिरिट ऑफ गोवा' महोत्सव आयोजित करणार आहे.

दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्रकिनाऱ्यावर तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात नारळ आणि काजूच्या फळांपासून बनवलेली विविध उत्पादने, पाककृती, पेये आणि हस्तकलेचे प्रदर्शन केले जाईल, ज्यात फेणी आणि हुर्राक यांसारख्या प्रसिद्ध पेयांचा समावेश आहे.

महोत्सवात काजू शुद्धीकरण आणि नारळाच्या रसाचे लाइव्ह डेमो, मास्टर क्लासेस आयोजित केले जाणार आहेत. यावेळी स्टॉम्पिंग स्पर्धा आणि ख्यातनाम व्यावसायिक व आचारी हजेरी लावतील. यावेळी स्वयंपाक आणि अस्सल गोव्याचे खाद्यपदार्थांचे प्रात्यक्षिक दाखविले जातील.

दक्षिण गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण कमी असल्याने. तेथील स्थानिक व्यवसायांवर याचा परिणाम होतो. तसेच राज्यातील मोठे महोत्सव आणि कार्यक्रम देखील उत्तर गोव्यात होत असतात.

अशात दक्षिण गोव्यातील पर्यटनाला बूस्टर देण्यासाठी राज्याच्या पर्यटन खात्याने दक्षिण गोव्यात मोठा महोत्सव आयोजित करणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

त्याच पार्श्वभूमीवर येत्या 21 एप्रिलपासून दक्षिण गोव्यात 'स्पिरिट ऑफ गोवा' महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT