Spicejet Independence Sale On Flight Tickets
Spicejet Independence Sale On Flight Tickets Dainik Gomantak
गोवा

Spicejet Sale: मुंबई - गोवा विमानाचे तिकीट केवळ 1,515 रूपयांत; स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पाइसजेटचा सेल

Pramod Yadav

Spicejet Independence Sale On Flight Tickets: स्वातंत्र्य दिनानिमित्त एका विमान कंपनीने स्वस्तात विमान तिकीट बुकिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत तुमचाही विमानाने प्रवास करण्याचा विचार असेल, तर स्पाइसजेटच्या या ऑफरचा तुम्ही देखील फायदा घेऊ शकता.

स्पाइसजेटच्या या ऑफरअंतर्गत तुम्ही 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत तिकीट बुक करू शकता. एवढेच नव्हे तर फक्त 15 रूपये जास्त देऊन तुम्ही आवडीची सीट देखील बुक करू शकता.

स्पाईसजेटने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फक्त रु.1515 मध्ये हवाई प्रवासाचे तिकीट बुक करू शकतात. या तिकिटाच्या रकमेत सर्व कर समाविष्ट आहेत. तसेच, फक्त 15 रुपयांमध्ये आवडती सीट देखील प्रवाशाला निवडता येणार आहे. यासोबतच प्रवाशाला 2000 रुपयांचे तिकीट व्हाउचर देखील मिळणार आहे.

या तिकीट बुकिंग अंतर्गत तुम्ही 15 ऑगस्ट 2023 ते 30 मार्च 2024 पर्यंत प्रवास करू शकता. म्हणजेच या ऑफरअंतर्गत मार्चपर्यंतच्या प्रवासासाठी तुम्हाला तिकीट बुक करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकीट दिले जाणार आहे. असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

या सेल अंतर्गत, चेन्नई-हैदराबाद, गुवाहाटी-बागडोगरा, मुंबई-गोवा, गोवा-मुंबई आणि जम्मू-श्रीनगरसह अनेक राज्यांसाठी प्रति व्यक्ती केवळ 1515 रुपये दराने तिकीट बुक करता येईल. दरम्यान, तिकीटाचा हा दर प्रारंभिक असून तो दर्जानुसार बदलू शकतो.

स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर केलेल्या स्पाइसजेटच्या या सेलचा ग्राहकांना लाभ घेता येईल. शिवाय सीट देखील बुक करता येईल. या ऑफरचा लाभ केवळ देशांतर्गत उड्डाणांवरच मिळणार असल्याचे कंपनीच्या सीईओने स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT