अर्धफोंड व माशे पुलांच्या दुरुस्ती कामाला गती Dainik Gomantak
गोवा

अर्धफोंड व माशे पुलांच्या दुरुस्ती कामाला गती; बस सुरू करण्याची मागणी

या पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर चावडी ते माशेपर्यंतच्या बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

दैनिक गोमन्तक

आगोंद: मडगाव ते पोळे मार्गावरील अर्धफोंड व माशे येथील पुलांच्या दुरुस्ती कामाला गती देण्यात आली असून ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करणार असल्याचे या पुलाच्या ठेकेदाराने सांगितले.

या पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर चावडी ते माशेपर्यंतच्या बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कदंब महामंडळ (kadamba Mahamandala) व खासगी बसमालकांसमोर या प्रवाशांना आपली सेवा देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अर्धफोंड पुलाच्या दुरुस्तीमुळे या मार्गावरून अवजड वाहनांबरोबरच कदंब आणि कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. या मार्गावरून केवळ मिनीबस ये-जा करीत आहेत‌. माशे ते शेळेरपर्यंतच्या प्रवाशांची तात्पुरती सोय करण्यासाठी माशे ते अर्धफोंडपर्यंत बससेवा सुरू करण्याची गरज आहे.

माशे, काराय, पैंगीण, अर्धफोंड, भाटपाळ, श्रीस्थळ, खालवडे आणि शेळेर या भागातून चावडी आणि अन्य भागात कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे लवकरात लवकर कदंब शटल सर्व्हिस सुरू करण्याची मागणी काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनीही संयुक्तपणे केली आहे.

मडगाव ते पोळे महामार्ध्यर्गावरील अर्धफोंड व माशे येथील पुलांचे दुरुस्ती काम सुरू असल्याने वाहनचालक व नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. हे दोन्ही पूल कमकुवत बनसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या पुलांच्या दुरुस्ती मागणी करण्यात येत होती. आता या पुलांच्या दुरुस्ती कामामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.

जलवाहिनी हलविण्याचेही काम सुरू

अर्धफोंड व माशे पुलांच्या दुरुस्ती कामाला सुरवात झाल्यानंतर जलवाहिनी आणि टेलिफोनच्या वाहिन्या काढून इतरत्र हलविण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यातील जलवाहिनी पुलाच्या दुसऱ्या बाजूला तात्पुरती हलवण्यात आली आहे, तर भूमिगत टेलिफोन वाहिन्या लवकरच काढण्यात येणार आहेत. या वाहिन्या काढल्यानंतर या पुलांच्या दुरुस्ती कामाला वेग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT