Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: क्रीडा संघटनेसाठी मैदान उपलब्ध केले जाईल; गोविंद गावडे

Govind Gaude About Stadium: त्या मैदानावर फुटबॉल वगळता अन्य खेळांसाठी परवानगी दिली जाणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: क्रीडा संघटनेकडून मागणी झाल्यास ठराविक वेळेपुरते चिखली येथील मैदान उपलब्ध केले जाईल. मात्र त्या मैदानावर फुटबॉल वगळता अन्य खेळांसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी या विषयी प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, ३६५ दिवसांपैकी ३० दिवसच सरासरी या मैदानाचा वापर होतो असे दिसते. यामुळे होतकरू खेळाडूंसाठी हे मैदान सरावासाठी उपलब्ध केले पाहिजे. आजकाल विद्यार्थी क्रीडांगणाकडे फारसे वळत नाहीत.

यामुळे १५ ऑगस्टला सकाळी लवकर बोलविली तर मुले चक्कर येऊन पडतात. मुलांना मोबाईलकडून मैदानाकडे नेण्यासाठी अशी मैदाने उपलब्ध केली पाहिजेत. वास्कोत एमपीटी मैदान होते, मुले दिवस रात्र तिथे असायची. आता त्या मैदानाच्या जागी ट्रक टर्मिनस करण्याचा बेत ऐकू येत आहे.

गावडे म्हणाले, चिखली मैदानाची आवश्यक ती दुरुस्ती १८० दिवसांत काम पूर्ण करून केली जाणार आहे. फिफा १७ वर्षाखालील सराव सामने या मैदानावर झालेले आहेत. भारत नेदरलँड मैत्रीपूर्ण सामनाही झाला.

टिळक मैदान खुले ठेवण्याचा प्रस्ताव व विनंती आलेली नाही. या मैदानावरील सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असल्यामुळे स्थानिक पातळीवर कोणी तरी या मैदानाची जबाबदारी घेतली पाहिजे. उतोर्डा, बाणावलीची मैदाने स्थानिकांना उपलब्ध केली आहेत, त्या धर्तीवर हे मैदान स्थानिकांना ठराविक वेळे पुरते उपलब्ध करता येते.

कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी यापूर्वी मैदानाचे कामे घेऊन ती पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर नवी कामे घेण्यास बंदी घालावी अशी सूचना केली. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सरकारने कोणाकडूनही प्रस्ताव येण्यापूर्वी खेळाडूंच्या नोंदी तपासून शालेय ते राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ही मैदाने ओळखपत्रांच्या बदल्यात खुली करावी, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT