Konkan Railways Dainik Gomantak
गोवा

होळीनिमित्त कोकण रेल्वेच्या खास गाड्या

मडगाव ते सुरतदरम्यान विशेष रेल्वेच्या फेऱ्या, पर्यटकांनाही फायदा

दैनिक गोमन्तक

मडगाव : पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेने होळीनिमित्त सुरत ते मडगाव दरम्यान खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गोव्यासह कोकणात होळीसाठी येणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 09193 आणि 09194 या दर आठवड्यातील दोन खास गाड्या विशेष दरात सुरु करण्यात येणार आहेत. (Konkan Railways News Updates)

09193 ही सुरत ते मडगाव (Madgaon) जंक्शन गाडी 17 मार्चला सुरतहून संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल व मडगावला दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता पोहोचेल. तसेच मडगाव ते सुरत ही 09194 या क्रमांकाची गाडी (Railway) मडगावहून 18 मार्च रोजी दुपारी 1.40 वाजता सुटेल आणि सुरतला दुसऱ्या दिवशी सकाळी 8.35 वाजता पोहोचेल.

या गाड्या वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी व करमळी स्थानकांवर थांबतील. या गाड्यांचे आरक्षण (Reservation) 6 मार्च 2022 पासून सर्व पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम काउंटर्स किंवा आयआरसीटीसी वेबसाईटवर सुरु होईल, असे कोकण रेल्वेतर्फे कळवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT