Mapusa Anand Niketan  Dainik Gomantak
गोवा

म्हापसात 'आनंद निकेतन'मधील मुलांना विशेष मार्गदर्शन

खजिनदार डॉ. दीक्षा पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: येथील ‘आनंद निकेतन’ या विशेष मुलांच्या शाळेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बार्देश शाखेने प्रथमोपचार विषयावर कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आयएमए बार्देश शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप नाईक, सचिव डॉ. लॉयड डिसोझा आणि खजिनदार डॉ. दीक्षा पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. आनंद निकेतन शाळेचे पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच आस्था संस्थेतर्फे हल्लीच स्थापना करण्यात आलेल्या ‘आनंद विहार’ या मजुरांच्‍या वस्तीतील मुलांच्‍या शाळेतील शिक्षिका स्मिता पाटील व विद्यार्थीही या वेळी उपस्थित होते.

डॉ. लॉयड डिसोझा व डॉ. दीक्षा पेडणेकर यांनी अत्यंत साध्या-सोप्या शब्दांत प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्कंद नाईक या मुलाने प्रथमोपचार या विषयावर आकर्षक भित्तीपत्रे तयार करून त्यासंदर्भात उत्तम माहिती दिली.

या कार्यशाळेला शाळेच्या संचालिका वृंदा मोये, संस्थेचे सचिव डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रमुख शिक्षिका गीता विश्वकर्मा व्यासपीठावर मान्यवरांसह उपस्थित होत्या. गीता विश्वकर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संस्थेचे सचिव डॉ. केळकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT