Rakhi  Dainik Gomantak
गोवा

Special Child : विशेष मुलांची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल!

केशव सेवा साधना विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी आपल्या हातांनी रंगबेरंगी सुरेख व आकर्षक राख्‍या तयार केल्‍या असून, त्‍या विक्रीसाठी ठेवल्‍या आहेत.

Shreya Dewalkar

हिंदू धर्मात वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळे सण साजरा केले जातात. त्यात आता उत्‍सवांचा महिना म्‍हणजे श्रावणमास सुरू झाला आहे. या महिन्‍यात बहीण-भावाचे नाते सांगणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन. यानिमित्त बाजारात विविध प्रकारच्‍या राख्‍या विक्रीस उपलब्ध झाल्या आहे. विशेष म्‍हणजे येथील केशव सेवा साधना विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी आपल्या हातांनी रंगबेरंगी सुरेख व आकर्षक राख्‍या तयार केल्‍या असून, त्‍या विक्रीसाठी ठेवल्‍या आहेत.

या मुलांनी सध्या पाच हजार राख्या बनविल्‍या असून, अजूनही त्‍या बनविल्‍या जात आहेत. सदर शाळेला मदत करण्यासाठी व राख्या खरेदी करण्यासाठी समाजातील अनेकजण पुढे येतात. विविध संस्था, क्लब, शाळांही या राख्‍या खरेदी करतात. तयार केलेल्या पाच हजार राख्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेण्यात आल्या आहेत.

लोकांच्या मागणीनुसार तसेच आकार व कलाकृतींनुसार राख्या तयार केल्या जात असून त्‍यांचा दर ५ ते ४० रुपये प्रतिनग असा आहे. केशव सेवा साधना विशेष मुलांच्या शाळेत एकूण ७४ मुले शिक्षण घेत आहे. त्‍यांनी तयार केलेल्या राख्या एवढ्या सुरेख आहेत की आत्मनिर्भर बनून स्वयंपूर्णतेकडे त्यांची वाटचाल सुरू असल्‍याचे दिसते.

केशव सेवा साधना विशेष मुलांच्या शाळेचे अध्यक्ष अॅड. सुदिन मराठे, व्यवस्थापक डॉ. अशोक आमशेकर, प्रमुख पाहुणे पाणीपुरवठा खात्याचे अभियंता संदीप कारखानीस, पराग आमोणकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष दीपक नाईक, शाळेच्या प्रमुख मैथली परब आदी मान्‍यवरांच्‍या हस्ते राख्यांची विक्री व प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.

या मुलांनी बनविलेल्‍या राख्‍या सध्‍या अनेक ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्‍या आहेत. तसेच शाळेच्या वेळेत कोणाला राख्या हव्या असतील तर ते त्‍या खरेदी करू शकतात, असे मैथली परब यांनी सांगितले.

या विशेष मुलांमध्‍ये कोणते ना कोणते कलागुण दडलेले आहेत. या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्‍याची गरज आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही मुले पुढे आपल्‍या पायावर उभी राहून स्‍वावलंबी बनण्‍यास मदत होईल. त्‍यामुळे त्‍यांना आपल्या कुटुंबावर निर्भर राहण्याची गरज भासणार नाही.

- मैथली परब,

केशव सेवा साधना शाळेच्‍या प्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT