Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Legislative Assembly Session: ‘प्रत्येक पक्षाला चर्चेसाठी मिळणार अर्धा तास’; तवडकर

Ramesh Tawadkar: कामकाज १८ दिवस चालणार आहे त्यामुळे चर्चेसाठी पुरेशी संधी प्रत्येकाला मिळणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभा अधिवेशनात प्रत्येक पक्षाला चर्चेत सहभागी होण्यासाठी केवळ अर्धा तास दिला जाईल. सभापतिपदी असताना प्रतापसिंह राणे सायंकाळी ७ वाजता कमकाज संपवायचे. आताही तसे करणे शक्य आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सांगितले. विरोधकांनी पुरेसा वेळ दिला जात नाही, त्यामुळे किमान एक तास प्रत्येक पक्षाला दिला जावा, अशी मागणी बैठकीत केली होती.

त्याबाबत सभापतींना विचारले असता ते म्हणाले, कामकाज १८ दिवस चालणार आहे. त्यामुळे चर्चेसाठी पुरेशी संधी प्रत्येकाला मिळणार आहे. विधानसभा अधिवेशनाच्या सुरवातीला सर्वांत उत्साह असतो, नंतर तो किती टिकतो हे जनतेलाही माहीत आहे. सभापती म्हणून मी सर्वांना समान न्याय देतो. सत्ताधारी व विरोधक यांना समान वेळ देतो. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाकडून कोण केव्हा कोणत्या विषयावर बोलणार याचे नियोजन केल्यास सर्व विषय ते १८ दिवसांत मांडू शकतात.

विरोधकांनी प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळत नाहीत अशा तक्रारी केल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की काही प्रश्न ८-१० खात्यांशी संबंधित असतात. त्यामुळे माहिती संकलनात वेळ जातो. त्यामुळे आमदारांनी एकाच खात्याशी संबंधित, मुद्देसूद प्रश्न विचारावेत अशी सूचना केली आहे. प्रशासनानेही वेळेत उत्तरे द्यावीत अशी सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

SCROLL FOR NEXT