Vijai Sardesai In Goa Assembly Winter Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: 'लास्ट वॉर्निंग! ...नाहीतर बाहेर काढू'; सभापतींनी बजावले, राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी विरोधकांचा गोंधळ

Goa Assembly Winter Session Governor Address: केरळमध्ये वर्षात ५० दिवसांचे अधिवेशन होऊ शकते तर गोव्यात एकच दिवसाचे का? असा प्रश्न आलेमाव यांनी केला.

Pramod Yadav

पर्वरी: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून (०६ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने झाली. पण, राज्यपालांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधी बाकावरील आमदारांनी अधिवेशनाच्या कमी कालावधीविरोधात सभागृहात निषेध बॅनर झळकावले.

सभापती रमेश तवडकरांनी विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज एकच दिवस चालणार असल्याने नाराज असलेले विरोधक राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी आक्रमक झाले.

राष्ट्रगीत समाप्त होताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उभं राहत अधिवेशनाच्या एक दिवसाच्या कालावधीवरुन प्रश्न उपस्थित केला. केरळमध्ये वर्षात ५० दिवसांचे अधिवेशन होऊ शकते तर गोव्यात एकच दिवसाचे का? असा प्रश्न आलेमाव यांनी राज्यपालांना उद्देशून विचारला.

युरी आलेमाव यांच्या विरोधी सुरात आमदार वेंझी व्हिएगस आणि विजय सरदेसाई यांनी देखील आवज उठवत कमी कालावधीवरुन हातात फलक घेऊन निषेध नोंदवला. विजय सरदेसाई यांनी कॅश फॉर जॉब स्कॅमवरुन सरकारवर निशाणा साधला.

पैसे घेऊन नोकरी देण्याची भाजप सरकारने नवी पद्धत सुरु केलीय. शांत बसेल त्याची सुटका केली जाते पण आवाज केल्यास कारवाई होते, अशा आशयाचा बॅनर सरदेसाईंनी हातात धरुन निषेध नोंदवला. विशेष बाब म्हणून राज्यपालांच्या अभिभाषण सुरु असताना सरदेसाई फलक घेऊन उभे राहिलेत.

हे अधिवेशन केवळ संविधानाची गरज म्हणून घेण्यात आले आहे. एक दिवसाचे अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या मुद्यांवरील चर्चा टाळायची आहे, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली. तर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला. हे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप आलेवाम यांनी केला. वेंझी व्हिएगस यांनी देखील एक दिवसाच्या अधिवेशन कालावधीवरुन सरकारवर निशाणा साधला.

राज्यपालांनी अभिभाषणात राज्य सरकारच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. सरकारने आयोजित केलेल्या संत फ्रान्सिस झेवियर शव दर्शन सोहळ्याचे कौतुक देखील राज्यपालांनी यावेळी केले. तसेच, फर्मागुडी येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालयाची माहिती देखील अभिभाषणातून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT