Calangute Dainik Gomantak
गोवा

Massage Parlour Sealed at Calangute: कळंगुटमध्ये सलूनच्या नावाखाली बेकायदेशीर मसाज पार्लर, पोलिसांकडून गाळा सील

एका भाड्याच्या रूममध्ये सलून टाकण्यात आले होते, मात्र, त्यानंतर आतमध्ये रूम्स तयार करण्यात आल्या.

Pramod Yadav

Illegal Massage Parlour Sealed at Calangute: कळंगुटमध्ये सलूनच्या नावाखाली बेकायदेशीर मसाज पार्लर चालवले जात असल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी भेट देत पोलिसांनी सलून सील केले आहे.

एका भाड्याच्या रूममध्ये सलून टाकण्यात आले होते, मात्र, त्यानंतर आतमध्ये रूम्स तयार करण्यात आल्या. संशय आल्याने मालकांनी याबाबत तक्रार केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुटमध्ये एक गाळा भाड्याने देण्यात आला होता. परमिंदर सिंग असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने या गाळ्यात सलून चालवणार असल्याचे मालकांना सांगितले. पण, काही काळानंतर त्याने गाळ्यात छोट्या छोट्या खोली बांधल्या. तसेच, त्यावरती एक टॉयलेट देखील बांधून घेतले.

त्याच्याकडे याबाबत कोणताही परवाना नव्हाता, दरम्यान याबाबत संशय आल्याने स्थानिकांनी मूळ गाळा मालकांना संपर्क साधून सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत माहिती दिली.

गाळ्याचे मूळ मालक मुंबईत असल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली व पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्पा असलेल्या गाळ्याला भेट देत, ती जागा सील केली आहे.

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

SCROLL FOR NEXT