South Goa Zilla Panchayat President Suvarna Tendulkar Dainik Gomantak
गोवा

South Goa Zilla Panchayat: विकास कामांचा धडाका! साडेतीन वर्षांत 550 विकासकामे पूर्ण; अध्यक्षांची माहिती

South Goa Zilla Panchayat President Suvarna Tendulkar: केंद्र सरकारकडून १५व्या वित्त आयोगाचे १४ कोटी रुपये मंजूर झाले होते तसेच राज्य सरकारतर्फे ५० कोटी रुपये मंजूर झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीतर्फे गत साडेतीन वर्षांत ५५० विकासकामे पूर्ण केली आहेत. आता सद्याच्या जिल्हा पंचायत सदस्यांचा दीड वर्षाचा कार्यकाळ बाकी असून यादरम्यान आणखी १०० विकासकामे पूर्ण केली जातील, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी बुधवारी (ता.१०) जिल्हा पंचायतीच्या मासिक बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

केंद्र सरकारकडून १५व्या वित्त आयोगाचे १४ कोटी रुपये मंजूर झाले होते तसेच राज्य सरकारतर्फे ५० कोटी रुपये मंजूर झाले होते. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या पंचवीसही जिल्हा सदस्यांनी आपआपल्या प्रभागात वेगवेगळी विकासकामे पूर्ण केली आहेत. ही सर्व विकासकामे पूर्ण करून दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीकडे कमीत कमी ३ ते ४ कोटी रुपये शिल्लक राहतील, असेही अध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले.

या मासिक बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तांताला मंजुरी देण्यात आली. सर्व सदस्यांनी आपआपल्या प्रभागातील विकासकामांची यादी सादर केली तसेच पावसाळ्यातील आपत्कालीन व्यवस्थापन परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला, अशी माहिती अध्यक्षांनी दिली. एका सदस्याने पर्यटन खात्याने पर्यटकांना धबधब्यांवर जाण्यास बंदी टाकण्यात आली आहे, हा विषय उपस्थित केला. त्याने सांगितले की, ही बंदी उठवण्यासाठी जिल्हा पंचायतीने प्रयत्न करावेत. या धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांमुळेच स्थानिकांचे पोट भरते.

सुवर्णा तेंडुलकर, अध्यक्ष, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत

राज्य सरकारने आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असून जिल्हा पंचायत सदस्यांच्या अधिकारांत वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यावर विचारविनिमय सुरू आहे. जिल्हा पंचायत सदस्यांच्या मासिक मानधनात वाढ करण्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे.

अनुदानात वाढ करण्याची मागणी

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी प्रत्येक सदस्याला केवळ दोन हजार रुपये अनुदान मिळते. एवढ्या रकमेत कसलेही काम होत नाही. त्यासाठी या अनुदानात वाढ करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव संबंधित खात्याला पाठविण्यात येईल.

तसेच रुमडामळ-दवर्ली व दवर्ली-दिकरपाल या दोन्ही पंचायतींच्या परिसरात कोमुनिदाद जमिनीसंदर्भात माहिती तसेच या परिसरात बेकायदेशीर धंदे सुरू आहेत त्यावर विचारविनिमय करून कारवाई करण्यासाठी संबंधित खात्यांना निवेदन दिले जाईल, असे अध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT