Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: दक्षिण गोव्यातील पोलिस निरीक्षकांना फोनशी वावगे? पत्रकारांच्या फोनलाही उत्तर नाही

South Goa Police: मडगाव स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक आणि कोलवाचे निरिक्षक सतीश पडवळकर या दोन अधिकाऱ्यांबाबत या तक्रारी जास्त आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: पोलीस अधिकाऱ्यांना सरकारने आपल्या पैशांनी फोन उपलब्ध करून दिले असले तरी दक्षिण गोव्यातील काही पोलीस निरीक्षकांना लोकांकडून येणाऱ्या फोनाशी वावगे आहे का, असे वाटण्याजोगी परिस्थीती निर्माण झाली असून काही अधिकारी लोकांचे फोनच घेत नाहीत, अशा तक्रारी वाढत आहेत.

मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक आणि कोलवाचे पोलीस निरिक्षक सतीश पडवळकर या दोन अधिकाऱ्यांबाबत या तक्रारी जास्त आहेत. यासंबंधी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांच्याकडेही या तक्रारी पोहोचल्या आहेत. उल्लेखनिय म्हणजे, हे अधिकारी पत्रकारांच्या फोनलाही उत्तर देत नाहीत.

यापूर्वी गोव्याचे माजी पोलीस महासंचालक जसपाल सिंग हे मडगाव पोलीस मुख्यालयात आले असता त्यांच्याकडे काही पत्रकारांनी तक्रारही केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांच्याकडे झालेल्या वार्तालापाच्या वेळीही पत्रकारांनी त्यांच्या कानावर ही बाब घातली होती. हे अधिकारी लोकांचे फोन घेत नसल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या असून प्रशासनाने यावर काहीतरी उपाय काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

Double Hat-Trick: अविश्वसनीय! एकाच डावात दोन गोलंदाजांनी घेतली हॅट्रिक, डबल हॅट्रिक घेणारे 'ते' दोन गोलंदाज कोण? Watch Video

Viral Video: देसी 'सीटी स्कॅन' मशीनचा भन्नाट जुगाड व्हायरल, डॉक्टर आणि रुग्ण बनून तरुणाईची कमाल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT