MP Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Parliamentary Defense Committee: देशाच्या प्रतिष्ठित संरक्षण समितीसाठी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

देशाच्या प्रतिष्ठित संरक्षण समितीसाठी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा गोवा आणि गोवावासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. कॅप्टन विरियाटो यांच्या नावाची यादी संसदीय सचिवालयाने जाहीर केली. २४ सप्टेंबर रोजी लोकसभेच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही संरक्षण समितीचे प्रमुख नियुक्त आहेत. काँग्रेसच्या स्थानिक सूत्रांनी कॅप्टन फर्नांडिस यांच्या नियुक्तीचे श्रेय राहुल गांधी यांना दिले.

२५ वर्षांच्या नौदल कार्यकाळात कॅप्टन विरियातो यांनी मिळवलेला अफाट अनुभव, या समितीसाठी त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यामागे कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. आपल्या सुरुवातीच्या वर्षांत सागरी अभियांत्रिकी क्षेत्रात युद्धनौकांवर सेवा दिल्यानंतर, कॅप्टन विरियातो वैमानिक बनले. सध्याच्या लोकसभेतील ते एकमेव युद्धनायक आहेत. १९९९ मध्ये कारगिल युद्धातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेला प्रतिष्ठित ‘विजय स्टार’ पदकाने गौरविण्यात आले.कॅ. विरियातो यांनी मेकॅनिकल तसेच एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवीधर असून डबल एमबीए तसेच सिक्स सिग्मासह ब्लॅक बेल्ट देखील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: सांतिनेझ परिसरातील तिसवाडी येथे एफडीए मोहीम

Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Crime: 2 वर्षांत 256 देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्‍ह्यांच्‍या घटना! मुख्‍यमंत्र्यांची माहिती; सर्वाधिक प्रकरणे चोरीची

Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

Liquor Seized: गोव्यात चेकनाक्‍यांवर 3.14 कोटींची दारू जप्‍त! मागच्या वर्षी मोठी कारवाई; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT