Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार; आरोपीला 10 वर्षांची कैद व एक लाखांचा दंड

Goa Sexual Assault Case: मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने मडगाव पोलिस स्थानकात २०१७ साली दिली होती.

Sameer Panditrao

पणजी: दक्षिण गोव्यातील एका १७ वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सेफ्टीन रझा कासांबी याला विशेष जलदगती न्यायालयाने (पोक्सो) दहा वर्षांचा सश्रम कारावास व एक लाखांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीने केलेला गुन्हा सादर करण्यात आलेल्या पुराव्यान्वये सिद्ध होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने निवाड्यात केले आहे.

मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने मडगाव पोलिस स्थाकात २०१७ साली दिली होती. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक व सध्याचे फातोर्डा पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली होती व न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने त्याला पोक्सो कायद्याच्या कलम ४ खाली शिक्षा ठोठावली आहे.

पीडित मुलगी व संशयित या दोघांचे प्रेम होते. मुलगी संशयितासोबत घरातून पळून गेली होती. दोघे सुरवातीला कारवारला गेले व एक दिवस राहिले. त्यानंतर ते गोव्यात परतून मडगाव येथील एका हॉटेलात राहिले होते. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर मडगाव रेल्वेस्थानकावर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

त्या दोघांची वैद्यकीय तपासणी करून मुलीची रवानगी‘अपना घर’मध्‍ये करण्यात आली होती. वैद्यकीय अहवालानुसार संशयिताने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे पोलिसांनी संशयिताविरोधात अपहरण व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून तपास केला होता. साक्षीदारांच्या जबान्या नोंदवून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT