Women Bike Rally Dainik Gomantak
गोवा

'शक्ती - सुपर शी' महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेसकडून गोव्यात महिलांची बाइक रॅली

महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांची बाइक रॅली काढण्यात आली.

Pramod Yadav

महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांची बाइक रॅली काढण्यात आली. दक्षिण गोवा जिल्हा युवक काँग्रेसने रविवारी हिरवा झेंडा दाखवून महिलांची बाइक रॅली काढली. काँग्रेसच्या देशव्यापी उपक्रम 'शक्ती - सुपर शी' या कार्यक्रमाचा हा एक भाग आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त गोवा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. महिला सक्षमीकरणावर आमचा विश्वास आहे. महिलांना शिक्षण, त्यांचे हक्क संरक्षण यांचा आम्ही आदर करतो.

सावर्डे, कुडचडे, सांगे आणि केपे या भागातून रॅली काढण्यात आली. या भागातील रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नादार यांनी आभार मानले आहेत.

महिला सक्षमीकरणासाठी आम्ही ही मोहिम सुरुच ठेऊ तसेच, वेगवेगळ्या मतदारसंघात बाईक रॅली केली जाणार असल्याचे नादार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खेळता-खेळता काळाने घातला घाला! मांगोरहिल येथे तीन वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

Horoscope: भानु सप्तमीचा दुर्मिळ शुभयोग! 'या' राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; मान-सन्मान, यश आणि धनलाभाचे प्रबळ संकेत

SCROLL FOR NEXT