Comunidade DG
गोवा

Margao News: मडगावातील 'कोमुनिदाद इमारतीचे' नूतनीकरण करा! दक्षिण गोवा सदस्यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Comunidade Building Renovation

सासष्टी: दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक मंगलदास गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा कोमुनिदाद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मडगावातील कोमुनिदाद इमारतीचे नूतनीकरण करण्याची मागणी सदस्यांनी केली तसेच डिजिटलायझेशनद्वारे जुने दस्ताऐवज जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दर महिन्याला कोमुनिदादचे (Comunidade) सदस्य बैठक घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करणार आहेत, असेही ठरविण्यात आले. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या मोजक्या ॲटर्नीनी समस्या मांडल्या. यामध्ये कोमुनिदाद इमारतींची दुरुस्ती, कोमुनिदाद मालकीच्या जमिनीवर होत असलेले अतिक्रमण अशा विषयांचा समावेश होता. सध्या कोमुनिदाद प्रशासन कचेरीला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यावर सुद्धा विचार विनिमय झाला.

मडगाव कोमुनिदाद वास्तूच्या नूतनीकरणास सदस्य संमती देण्यास तयार आहेत. हे काम साबांखामार्फत होणार आहे. इमारतीचा मालकी हक्क कोमुनिदादकडेच रहावा, असा सदस्यांचा हट्ट आहे. त्यामुळे बांधकाम खात्याने नेमका काय निर्णय घेतला, हे स्पष्ट नसल्याचे कळते. या बैठकीमुळे अनेक समस्यांवर प्रकाश पडला,असे ॲटर्नी सेलेस्टीन नॉरॉन्हा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Israel-Iran War Impact: तणाव इराण-इस्त्रायलमध्ये, झळ भारताला; तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदाराची वाढली चिंता!

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

Debt Crisis: जगातील 'हे' 7 देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, तीन देश तर भारताचे शेजारी!

गोव्यात खाजगी क्षेत्राची उपेक्षाच! प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून देणार? बेरोजगारीची समस्या कशी सोडवणार?

SCROLL FOR NEXT