Tenant Verification Dainik Gomantak
गोवा

South Goa: दक्षिण गोव्यातील घर, हॉटेल-लॉजिंग, शॅक मालकांनो भाडेकरू ठेवताय? मग लवकर करून घ्या हे काम अन्यथा...

गोव्यात अलिकडे परराज्यातील लोकांचा विविध गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. तसेच, राज्यात विना भाडेकरार करता राहणाऱ्याची संख्या देखील अधिक असल्याची माहिती वेळोवेळी समोर आली आहे.

Pramod Yadav

गोव्यात अलिकडे परराज्यातील लोकांचा विविध गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. तसेच, राज्यात विना भाडेकरार करता राहणाऱ्याची संख्या देखील अधिक असल्याची माहिती वेळोवेळी समोर आली आहे. दरम्यान, दोन्ही जिल्ह्यात करण्यात आलेल्या धडक मोहिमेत अनेकजण विना भाडेकरार व कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे दिसून आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील मालमत्ता धारकांना तेथे राहणाऱ्या लोकांचा भाडे करार करण्याची सूचना केली आहे.

काहीजण गुन्हे करण्याच्या उद्देशाने राज्यात राहतात व गुन्हा करून फरार होतात. कोणत्याही प्रकारची नोंदणी नसल्याने त्यांची माहिती मिळवणे कठिण जाते, यामुळे तपासात अनेक अडचणी येतात. याशिवाय असे गुन्हेगारी प्रवृत्तेचे लोक त्यांची ओळख देखील बदलून पोलिसांनी गुंगारा देतात.

त्यामुळे बाहेरून राज्यात येऊन भाडे पद्धतीवर राहणाऱ्या लोकांची नोंदणी होणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या संबधित माहिती मिळवणे प्रशासनाला देखील सोपे जाते. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी भाडेकरार संबधित सूचना जारी केली आहे.

काय आहे आदेश?

दक्षिण गोव्यातील घर, इमारत, फ्लॅट धारक, हॉटेल-लॉजिंग-बोर्डिंग, शॅक, खासगी गेस्ट हाऊस, पेईंग गेस्ट याठिकाणी भाडे करारावर राहण्याऱ्या लोकांची भाडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

यासाठी मतदान कार्ड, चालक परवाना, आधार कार्ड, पासपोर्ट अशा कागदपत्रांची माहिती घ्यावी.

हॉटेल-लॉजिंग-बोर्डिंग धारकांनी भाडेकरूंची माहिती सरकारच्या पथिक सॉफ्टवेअरमध्ये अद्यावत करण्याची व्यवस्था करावी.

संबधित भाडेकरूची माहिती परिक्षेत्रातील पोलिस स्टेशनला दिल्याशिवाय भाडेकरू ठेवू नये सक्त ताकीद आदेशात देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या एटीएम साठी सुरक्षा रक्षक आणि त्या परिसरात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याची सूचना केली आहे.

आदेश 06 मार्चपासून पुढील साठ दिवसांसाठी लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर IPC 188 अतंर्गत कारवाई केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT