South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिण गोव्यात चोरट्यांची टोळी सक्रिय; आंध्रप्रदेशातील टोळीची शक्यता

South Goa : सासष्टी तालुक्याला चोरांनी सध्या लक्ष्य केल्याचे दिसून येते. चोरीच्या घटनांची पाहणी केली असता मार्च महिन्यांत वास्को, कुंकळ्ळी व वेळ्ळीतील शाळांतून चोऱ्या वाढल्याचे दिसते.

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

मडगाव, दक्षिण गोव्यात एका पाठोपाठ एक घरफोडी होऊ लागली असून त्‍यामुळे सर्व पोलिस यंत्रणा हैराण झाली आहे. एका मागोमाग एक घरफोडी होत असून या सर्व चोऱ्या पाहिल्‍यास दक्षिण गोव्‍यात टोळी सक्रिय झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

या सर्व चोऱ्यांची पद्धती पाहिल्‍यास यापूर्वी गोव्‍यात धुमाकूळ घातलेली आंध्रप्रदेशातील चोरट्यांची टोळी पुन्‍हा सक्रिय झाली असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

बंद घरे हेरणे आणि घरात कोणी नसताना दरवाजा फोडून आत शिरुन हाताला लागेल, ते सामान घेऊन पळून जाणे ही या आंध्रप्रदेशच्‍या टोळीची कार्यपद्धती असून यापूर्वीही अशा प्रकारच्‍या चोऱ्या या टोळीने केल्‍या होत्‍या. त्‍याचीच आता पुनरावृत्ती होत आहे, असे दिसून येते.

दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांना विचारले असता, सर्व चोऱ्यांमध्ये कुठल्‍या तरी एका टोळीचा हात असावा, ही शक्‍यता नाकारता येत नाही. या चोऱ्यांचा छडा लागावा, यासाठी आम्‍ही सर्व कोणातून तपास करत आहोत. या चोऱ्यांचा आम्‍ही लवकरच छडा लावू असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

याच आठवड्यात रविवारी बेताळभाटीतील बंद घरात चोरीचा प्रयत्न झाला. त्याचदिवशी बाळ्ळी येथील घरातून ४.३२ लाखांचा ऐवज चोरीला गेला, बुधवारी रात्री लोलयेतील बंद असलेली तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला होता, या दोन्‍ही घटनांमधील साम्‍य म्‍हणजे या दोन्‍ही ठिकाणी जे प्रयत्‍न झाले आहेत त्‍या घरांत लोक रहात नाहीत. त्‍यामुळेच या सर्व चोऱ्यांमध्ये एकच टोळी असावा, या संशयाला अधिक पुष्टी मिळते.

सासष्टी तालुक्याला चोरांनी सध्या लक्ष्य केल्याचे दिसून येते. चोरीच्या घटनांची पाहणी केली असता मार्च महिन्यांत वास्को, कुंकळ्ळी व वेळ्ळीतील शाळांतून चोऱ्या वाढल्याचे दिसते. तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून बंद घरांसह वस्ती असलेल्या घरांतही चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येत असतानाही चोरीच्या घटनांतील वाढ ही चिंतेची बाब आहे.

देवालये, विद्यालये लक्ष्य

१ मार्च रोजी आगोंद येथील आगोंदेश्वर देवालयातील फंडपेटी फोडून चोरांनी ८० हजारांची रोकड व मंदिरातील घंटा, समई व इतर असे दोन लाखांचे साहित्य लंपास केले. १० मार्च रोजी आल्त दाबोळी येथील केशव स्मृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये घुसून चोरांनी सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल चोरला.

आल्त दाबोळी येथील एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लटॅमधील चार मोबाईल व कॅमेरा असा एक लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल चोरांनी लांबविला. विमानतळावर काम करणारे युवक फ्लॅटमध्ये झोपलेले असतानाही १५ मार्च रोजी ही घटना घडली.

२८ मार्च रोजी दुर्भाट फोंडा येथील साईबाबा मंदिरातील फंडपेटी फोडून सुमारे ५० हजार रुपयांची चोरी केली. २१ मार्च रोजी धारबांदोडा येथील बंद असलेल्या संजीवनी साखर कारखान्याच्या परिसरातील साहित्याची चोरी झाली.

सीसीटीव्‍ही फुटेजचा आधार

बेताळभाटी येथे जो बंगला फोडण्‍याचा प्रयत्‍न झाला, त्‍यावेळी तिथे लावलेल्‍या कॅमेऱ्यावर दोन चोरांची छबी चित्रित झाली होती. हेच फोटो सध्‍या पोलिसांसाठी एक आधार बनले आहेत. या फोटोवरुनच गोव्‍यातील चोऱ्यांमध्ये आंध्रमधील टोळीचा हात असावा, असा तर्क पुढे आला आहे.

एका महिन्‍यापूर्वी नावेली येथे वेर्णेकर कुटुंबीयांचा फ्‍लॅट फोडून ३७ लाखांचे दागिने पळविले होते. या चोरीतही याच टोळीचा हात असावा, असा संशय आहे. आपल्‍या घरात झालेल्‍या चोरीचा छडा लावणाऱ्यांसाठी वेर्णेकर कुटुंबीयांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT