Election Dainik Gomantak
गोवा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Comunidade Election: गोव्यातील कोमुनिदादींच्या कार्यकारी समित्या निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. पण दक्षिण गोव्यातील ९० पैकी ३० कोमुनिदादींच्या निवडणुका गणपूर्तीअभावी होऊ शकल्या नाहीत.

Sameer Panditrao

सासष्टी: गोव्यातील कोमुनिदादींच्या कार्यकारी समित्या निवडण्यासाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. पण दक्षिण गोव्यातील ९० पैकी ३० कोमुनिदादींच्या निवडणुका गणपूर्तीअभावी होऊ शकल्या नाहीत. या निवडणुका पुन्हा घ्याव्यात, अशी मागणी या कोमुनिदादींच्या सदस्यांनी केली आहे.

कोमुनिदाद कायद्यानुसार निवडणुका न झाल्यास ‘कोमुनिदाद इन डिफॉल्ट’ म्हणून जाहीर करणे व सरकारतर्फे कस्टोडियनची नियुक्ती करणे, असा नियम आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक अभिजीत निकम यांनी या ३० कोमुनिदाद प्रतिनिधींची १ जुलै रोजी बैठक बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी या कोमुनिदादच्या प्रतिनिधींनी या निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली.

यासंदर्भात दक्षिण गोवा कोमुनिदाद फोरमचे सचिव सावियो कुर्रैया म्हणाले, की त्यांनी डिसेंबरमध्ये या ३० कोमुनिदादींच्या निवडणुकीवेळी गणपूर्ती का झाली नाही, याची कारणे प्रशासकांना सादर केली. पहिले कारण म्हणजे, या निवडणुका योग्यप्रकारे घेतल्या नाहीत. दुसरे कारण, निवडणुकांची वेळ योग्य नव्हती.

डिसेंबरमध्ये कोमुनिदादचे सदस्य नाताळच्या तयारीत होते. शिवाय त्या दिवसांत जुने गोवे येथे एक्सपोझिशन सुरू होते. त्याचप्रमाणे जवळच्या कोमुनिदाद निवडणुका एकाच दिवशी, एकाच वेळी असल्याने सदस्यांना केवळ एकाच कोमुनिदाद निवडणूक प्रक्रियेत भाग घेणे शक्य झाले. अशा स्थितीत आम्ही या कोमुनिदादींच्या पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली, असे कुर्रैया म्हणाले.

या बैठकीला ३० पैकी १० कोमुनिदादींचे प्रतिनिधी उपस्थित होते. बाकी वीस कोमुनिदादींच्या प्रतिनिधींनी लेखी सूचना पाठविल्या. ज्या ३० कोमुनिदादींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, त्यात २० सासष्टी, ६ मुरगाव, तसेच चार सांगे-केपे तालुक्यांमधील आहेत.

२२ जुलै रोजी बैठक

प्रशासकांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असून २२ जुलै रौजी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी जे कोणी कोमुनिदाद कार्यकारी समितीत काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांना इच्छापत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत प्रशासकाने दिली आहे. त्यानंतर ते सरकारला शिफारस करतील, असेही सावियो कुर्रैया यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT