Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

सोनसोडोवरील कोसळलेल्या भिंतीची लवकरच दुरुस्ती

नगराध्यक्ष लिंडन परेरा यांची माहिती

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: सोनसोडो कचरा यार्डवर काही दिवसापूर्वी आग लागून झालेल्या वीज साहित्याच्या दुरुस्तीचे काम आणि कोसळलेल्या भिंतीच्या कामाला सुरवात येत्या आठवड्यापासून करण्यात येणार असल्याचे मडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितले.

येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली तेव्हा मडगाव नगरपालिकेचे अभियंते, जिल्हा पालिका संचालक, जी सुडाचे अधिकारी व इतर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी पाहणी केली होती आणि येथील परिस्थितीच्या नुकसानीचा अंदाज घेतला होता.

या कचरा यार्डवर बेलिंग मशीन, वीज ट्रान्सफॉर्मर सहित इतर उपकरणे यांना आग लागून येथील एकंदरीत 40 लाख रुपयांचे नुकसान झाले होते तसेच कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेल्या संरक्षण भिंत कोसळून या नुकसानीत आणखी भर पडली होती.

कोसळलेल्या भिंतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो पालिका संचालकांना सादर करण्यात येणार आहे. यानंतर येथील दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष परेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT