Soon, Goa Tourism dept to pay those collecting glass bottles from the beaches Dainik Gomantak
गोवा

पर्यटन मंत्र्यांची अभिनव योजना; दारूच्या रिकाम्या बाटल्या परत करा, पैंसे मिळवा

समुद्रकिनाऱ्यावरुन गोळा केलेल्या काचेच्या बाटल्यांचं सरकार देणार पैंसे

दैनिक गोमन्तक

राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर तुटलेल्या बाटल्यांच्या समस्या सतत भेडसावत आहेत, त्यामुळे गोवा पर्यटन विभागाने किनाऱ्यावरून काचेच्या बाटल्या गोळा करून विक्रेत्यांना परत सुपूर्द करणार्‍यांना प्रोत्साहन देणारी योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, समुद्रकिनार्‍यांवर आधीच काचेच्या बाटल्या नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे, त्याची अधिक काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. (Soon, Goa Tourism dept to pay those collecting glass bottles from the beaches)

परंतु, असे असूनही काही पर्यटक आहेत, जे या बाटल्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जातात, त्या तेथेच सोडतात. या बाटल्यांच्या काचांमुळे समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक आणि स्थानिकांनी जखमी झाल्याची तक्रार केली आहे, अशीही माहिती खौंटे यांनी दिली.

समुद्रकिनारपट्टीवरील व्यावसायिक आणि पर्यटन विभागाच्या मदतीने राज्य सरकार समुद्रकिनारी पडलेल्या काचेच्या बाटल्या आणणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आणणार आहे. जर कोणी बाटली घेऊन दुकानात परत आला तर त्याला दुकानदार काही ठराविक रक्कम परत करणार आहेत. तसेत या योजनेचा मसुदा तयार करताना बीअर उत्पादकांसारख्या कंपन्यांनाही विश्वासात घेऊ, असे खौंटे म्हणाले. तसेच या योजनेमुळे समुद्रकिनारा व्यवस्थापनास मोठ्या प्रमाणात मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT