Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

राज्यातील वारसास्थळांचा लवकरच विकास: श्रीपाद नाईक

मडगावात पत्रकारांशी बोलताना

दैनिक गोमन्तक

सासष्टी: राज्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवरील साधन सुविधांचा तसेच तीर्थक्षेत्रे (मंदिरे) व वारसा स्थळांचा विकासही केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे केला जाईल ,अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी तीन योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांद्वारे गोव्यालाही केंद्राकडून आर्थिक सहाय्य मिळेल,असे नाईक यानी सांगितले.

गोव्यात खाणी बंद असल्याने पर्यटन हाच गोव्यासाठी सध्या महसूल प्राप्तीचा प्रमुख स्त्रोत बनला आहे. त्यासाठी गोव्यात जास्तीत जास्त पर्यटक कसे आकर्षित होतील, याकडे सरकार लक्ष देणार आहे, असेही त्यानी सांगितले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यानी नवी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांची भेट घेऊन पर्यटन विकास आराखडा सादर केला. मंत्री रेड्डी यांनीही सर्वतोपरी सहकार्याचे आश्र्वासन दिल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT