Coconut Shell Dainik Gomantak
गोवा

Coconut Shell Scraper :एका तासात 500 किलो नारळाच्या कचऱ्याची विल्हेवाट; सोनसोडोत यंत्राचे उद्‌घाटन, खतासाठी होणार वापर

Sonsodo Waste Project: सोनसोडो कचरा प्रकल्पात आज नारळाच्या करवंट्या फोडण्याच्या यंत्राचे उद्‍घाटन आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सोनसोडो कचरा प्रकल्पात आज नारळाच्या करवंट्या फोडण्याच्या यंत्राचे उद्‍घाटन आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबिता नाईक, मुख्याधिकारी मेल्विन वाझ, नगरसेवक व स्वच्छता समितीचे चेअरमन कामिल बार्रेटो व इतर नगरसेवक उपस्थित होते.

हे खास डिझाईन केलेले मशीन असून त्याची किंमत १३ लाख रुपये आहे. या मशीनमुळे नारळाच्या करवंट्याचा बारीक पावडर करणे शक्य होईल. त्याचा वापर खत म्हणून वापरता येईल. या मशीनमुळे करवंट्यांच्या कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. या मशीनमुळे करवंट्या, पानांची योग्य विल्हेवाट लावणे शक्य होईल, असे आमदार दिगंबर कामत यानी सांगितले.

कामत म्हणाले, अशाच प्रकारचे फिरते मशीन आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जिथे करवंट्यांचा किंवा कचऱ्याच्या राशी आहेत, तिथे हे मशीन नेऊन त्याची विल्हेवाट लावणे शक्य होईल. हा कचरा सोनसोडो कचरा प्रकल्पात आणण्याची गरज भासणार नाही.

दोन मशीन उपलब्ध!

सोनसोडो कचरा प्रकल्पातील हे अशा प्रकारचे दुसरे मशीन आहे. यापूर्वी नारळाच्या पानाची विल्हेवाट लावणारे मशीन बसविण्यात आले होते. या मशीनला गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीची मान्यता आहे. एका तासात ५०० किलो नारळाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT