Sonsodo waste dainikgomantak
गोवा

Goa Environment : सोनसोडो प्रकल्पात वाढल्या कचऱ्याच्या राशी

शॅडो काैन्सिलने वेधले लक्ष : पुन्हा लाखो रुपये खर्चून कचरा साफ करणार का?

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पात पुन्हा एकदा कचऱ्याच्या राशी वाढल्या असून सुमारे १० हजार क्युबिक टन कचरा येथे साचल्याचा दावा शॅडो कौन्सिल या संघटनेने केला आहे. हा कचरा साफ करण्यासाठी पुन्हा एकदा लाखो रुपये खर्च करणार का, असा सवाल या संघटनेचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला आहे.

आज कुतिन्हो यांनी या प्रकल्पाला भेट दिली असता त्यांना या कचऱ्याच्या राशी दिसल्या. तीन महिन्यांपूर्वीच घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने या प्रकल्पात साठलेला १४ हजार टन कचरा साफ केला होता.

मडगाव पालिकेद्वारे योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. सोनसोडो प्रकल्पावरही काम चांगल्यारितीने होत आहे. शॅडो काैन्सिल कचरा साठून राहिल्याचा जो दावा करत आहे, तो कशाच्या आधरावर हे कुतिन्हो यांनाच माहीत असेल.

- दामोदर शिरोडकर, मडगाव नगराध्यक्ष

न्यायालयाने कामावर देखरेख ठेवावी

कचऱ्याचा विषय आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून येत्या सहा महिन्यांत हा कचरा साफ होणे आवश्‍यक आहे. मडगाव शहरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते ते कामही न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावे, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली.

‘बायो रेमेडिएशन’चा वापर :

फोमेंतो कंपनीने येथील कचरा प्रक्रिया करण्याचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये सोडले होते. त्यानंतर जून २०२० मध्ये पहिल्यांदा पालिकेने ८५ लाख रुपये खर्च करून आत साठलेला कचरा बायो रेमेडिएशन पद्धतीने साफ केला. हा प्रकल्प म्हणजे फक्त पैसे उकळण्याचा प्रकार हेच सिद्ध होत आहे, असा आरोप कुतिन्हो यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT