Sonali Phogat Case  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat: सोनाली फोगट हत्या प्रकरणातील संशयित सुखविंदर सिंगचा जामीन फेटाळला...

यापुर्वी हणजुणेच्या उपसरपंचांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला होता

गोमंतक ऑनलाईन टीम

Sonali Phogat Death Case: टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख संशयित असलेल्या सुखविंदर सिंग याचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे. पणजी सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हणजुण येथील कर्लीस क्लबमध्ये फोगट सोनाली यांना अंमली पदार्थ जबरदस्तीने पाजण्यात आले होते. याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले.

दरम्यान याच कर्लीस क्लबमध्ये ऍग्नेस डिसोझा (रा. पेढे) गेल्या 12 वर्षांपासून क्लबच्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. त्यांना या प्रकरणात सीबीआयकडून अटक होण्याची भिती वाटत होती. याच कारणाने त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता.

पण म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने हणजुण पंचायतीच्या उपसरपंच ऍग्नेस डिसोझा यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला होता. अर्जदार ऍग्नेस मागील 3 सुनावणींसाठी कोर्टासमोर हजर न राहिल्याने न्यायालयाने कार्यवाही बंद केली आहे.

पंचायत निवडणुकीत ऍग्नेस डिसोझा उपसरपंचपदावर निवडून आल्यानंतर त्यांनी कर्लीस क्लबमधील काम सोडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT