गोवा

Sonali Phogat Murder Case: संशयित रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांना जामीन मंजूर

एनडीपीएस न्यायालयाकडून 30 हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

गोमन्तक डिजिटल टीम

सोनाली फोगाट हत्याप्रकरणातील (Sonali Phogat Murder Case) संशयित ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर व रामदास उर्फ रामा मांद्रेकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनडीपीएस न्यायालयाकडून 30 हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच, प्रत्येकी 15 हजारांचे दोन स्थानिक हमीदारासह त्यांना जामीन दिला आहे. एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

यापूर्वी सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाशी संलग्न असलेल्या कर्लिस रेस्टॉरंटचा चालक एडविन नुनिस यास म्हापसा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी (7 सप्टेंबर) सशर्त जामीन मंजूर केला. मात्र संशयितास कर्लिस रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, ही महत्त्वाची अट घातली आहे. त्यानंतर संशयित दत्तप्रसाद गावकर व रामदास उर्फ रामा मांद्रेकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, सोनाली फोगाट प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. सीबीआय पथक हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोव्यात दाखल झाली आहे. पथकाने सुरूवातीला कर्लिस रेस्टॉरंट आणि परिसराची झाडाझडती घेतली.

सीबीआयने शनिवारी दिवसभर ‘लिओनी’ रिसॉर्टमध्ये सोनाली तसेच सांगवान व सुखविंदर सिंग वास्तव्यास असलेल्या 3 खोल्यांची बारकाईने तपासत सील केल्या. त्यानंतर काल रविवारी सकाळी पथकाने ‘कर्लिस’कडे मोर्चा वळविला. दोन तास या शॅकच्या शौचालयात ज्या ठिकाणी सोनाली या बेशुद्धावस्थेत पडून होत्या त्या जागेची पाहणी केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT