Sonali Phogat  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat case : सोनाली फोगट हत्येची सीबीआय चौकशी व्हावी

मायकल लोबोंचं गोवा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच बोट

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat case : भाजपा कार्यकर्ता सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली असली, तरी या प्रकरणाची खोलवर पाळेमुळे ही हरियाणात दडली आहेत. फोगट यांच्या हत्येच्या या कटकारस्थानामागे नक्की कोण आहे? याचा उलगडा करण्यासाठी याचा पुढील तपास आता केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) माध्यमातून होणे गरजेचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते मायकल लोबोंनी मांडले.

शुक्रवारी सायंकाळी, पर्रा येथे आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सुरुवातीला फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असे सांगण्यात आले, परंतु शवविच्छेदन अहवालातून दुसरीच बाब समोर आली. अशावेळी याप्रकरणी सर्व दृष्टिकोनातून तपास झालाच पाहिजे. मात्र, गोवा पोलिस लपवाछपवी करताना दिसले, जेणेकरून सोनाली फोगट यांचा मृतदेह हिस्सारला लवकरात पाठविता येईल, असे म्हणत लोबोंनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले.

‘सीसीटीव्हींचे जाळे हवे’

सिद्धी नाईक कथित मृत्यूप्रकरणी मी सखोल चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी सर्व दृष्टिकोनातून तपास होण्याची गरज आहे. कारण सिद्धीला जबरदस्तीने कुणी पाण्यात बुडून मारले होते का? हेही तपासण्याची गरज आहे. माझ्या मते, या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झालेला नाही, असे मायकल लोबोंनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मुळात आम्ही सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो. मात्र, त्याची देखरेख होत नाही. मुळात सीसीटीव्हीची जबाबदारी पोलिसांनी स्वीकारली पाहिजे. तसेच संपूर्ण किनारी भागात सीसीटीव्हीचे जाळे विणले पाहिजे, गोव्यात तुम्ही दर्जेदार पर्यटकांची मागणी ठेवत असल्यास, पर्यटकांना तशी सुरक्षा द्यावी लागेल, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT