Sonali Phogat Case  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Death Case: सोनाली फोगाट हत्या प्रकरणी न्यायालयाची मोठी अपडेट

सोनाली फोगाट हत्या प्रकरणी त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि स्टाफ मधील सहकारी सुखविंदर पाल सिंग यांना 25 ऑगस्ट रोजी गोवा पोलिसांनी अटक केली.

Pramod Yadav

Sonali Phogat Death Case: टिक-टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचा 23 ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास गोवा पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने गोव्यातील तपास पूर्ण करत परतली. दरम्यान, या प्रकरणाची म्हापसा न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत महत्वाची अपडेट समोर आली असून, गोवा पोलिसांसह (Goa Police) सीबीआयच्या (CBI) तपास अधिकाऱ्यांना देखील न्यायालयाने पुढच्या सुनावणीसाठी महत्वाचे निर्देश दिले आहेत.

म्हापसा न्यायालायाची आजची सुनावणी

म्हापसा न्यायालयात (Mapusa Court) आज (सोमवारी) सोनाली फोगाट हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. यात न्यायालयाने फोगाट हत्या (Sonali Phogat Death Case) प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. संशयित आरोपींना न्यायालयात का हजर केले नाही यासाठी म्हापसा न्यायालयाने कोलवाळ तुरूंग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच, पुढील सुनावाणीवेळी सीबीआय तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

सोनाली फोगाट हत्या प्रकरणी त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि स्टाफ मधील सहकारी सुखविंदर पाल सिंग (Sukhwinder Singh & Sudhir Sangwan) यांना 25 ऑगस्ट रोजी गोवा पोलिसांनी अटक केली. गोवा पोलिसांकडून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली फोगाट कुटुंबियांनी केली. सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आल्यानंतर, 16 सप्टेंबर रोजी मुंबईतील सीबीआय पथक तपासासाठी गोव्यात दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT