Som Yag Yadnya 2023 Gomantak Digital
गोवा

Som Yag Yadnya 2023: गोव्यात होणाऱ्या यज्ञ उत्सवाची ६ वैशिष्ट्ये माहितीये का?

गोमन्तक वृत्त्सेवा

Som Yag Yadnya 2023 Festival Goa

सृष्‍टीचक्रातील सामाजिक आध्‍यात्‍मिक, वैचारिक वातावरण निकोप व शुद्ध व्‍हावे, या उदात्त हेतूने गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे म्‍हापसा येथे विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. समस्‍त गोमंतकीयांनी या सोहळ्यात सहभागी व्‍हावे व मांगल्‍य, प्रसन्‍नतेची अनुभूती घ्‍यावी, असे आवाहन अग्निहोत्री सुहोता दीपक आपटे (दीक्षित) यांनी केले आहे.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’वर खास मुलाखतीत त्‍यांनी सोमयाग विषयक अनेक कंगोरे उलगडले. व्‍यक्‍तिगत स्‍वार्थ नव्‍हे, विश्‍‍व कल्‍याणासाठी दुर्मीळ सोमयाग यज्ञ होत आहे. यज्ञामुळे पंचमहाभूतांना बळकटी देण्‍याच कार्य घडणार आहे. गोव्‍यात यज्ञाची जुनी परंपरा आहे. त्‍याचे उत्‍थान होणार आहे. गोव्‍याची काही वैशिष्‍ट्‍यांपुरती सीमित ओळख नसून, आध्‍यात्‍मिक क्षेत्रातही गोव्‍याचा विशेष लौकिक आहे. सोमयाग यज्ञ उत्‍सवामुळे त्‍याला अधिक झळाळी लाभेल, असे आपटे म्‍हणाले.

दहा दिवसांचा उपवास

यजमानपद अग्निहोत्री सुहोता दीपक आपटे (दीक्षित) हे सपत्‍नीक भूषविणार आहेत. ज्‍यांच्‍याकडून दिवसातील २४ तास अग्‍निहोत्र सेवा होते, तसेच अन्‍य कठोर निकष पार पडले जातात, त्‍यांनाच सोमयाग यज्ञ करण्‍याचा अधिकार मिळतो. संबंधित व्‍यक्‍तींना दहा दिवस केवळ पाणी व लिंबूरसावर राहावे लागते. या दिवसांत भोजन वर्ज्य असते.

यज्ञाची वैशिष्‍ट्‍ये -

1. यज्ञस्थळी तीन वेदांसह सामवेदातील गायनही होते.

 2. सहभागासाठी ज्ञाती, धर्माचे कोणतेही बंधन नाही

 3. सकाळी ७ ते सायंकाळी ७.३० यज्ञ चालेल. दुपारी महाप्रसाद.

 4. यज्ञाचा अर्थ, उपयुक्‍तता उपस्‍थितांना सांगण्‍यात येणार.

 5. कढवलेले तूप, दूध यांच्‍या मिश्रणातून निघतात २५ फुटी ज्‍वाळा

 6. यज्ञाच्‍या परिणामांचा शास्‍त्रीय कसोटीवर होणार अभ्‍यास

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT