ship dainik gomantak
गोवा

Goa News : सौरऊर्जा बोटसेवेला लवकरच होणार सुरुवात

बंदर कप्तान खाते : चार्जिंग सुविधा मिळणार; चोडण येथे नवीन तरंगती जेटी ठरणार आकर्षण

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : ऑक्टोबरमध्ये उद्‍घाटन झालेली सौरऊर्जा बोटसेवा आता लवकरच सुरू होणार आहे. पणजी ते चोडणदरम्यान ही बोट चालणार असून पणजीतील तरंगत्या जेटीवर चार्जिंगची सुविधा तयार केली जात आहे, तसेच चोडण येथे याच महिन्यात तरंगती जेटी आल्यानंतर सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती बंदर कप्तान खात्याने ‘दै.गोमन्तक’ला दिली.

केंद्रीय जहाज उद्योग संचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक बंदरावर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा असणे आवश्‍यक आहे. जेणेकरून, जहाज आणि बोट्सना याचा लाभ होईल. त्यानुसार बंदर कप्तान खात्याअंतर्गत येणाऱ्या तरंगत्या जेटींवर इलेक्ट्रिक चार्जिंग, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी तरतूद केली आहे. पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

४.२ कोटी खर्च

सौरऊर्जा बोट बांधण्यासाठी एकूण ४.२ कोटी रुपये खर्च आला आहे. बोटीमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर असून प्रत्येक मोटरची क्षमता १३० किलो वॅट असल्याने बॅटरीद्वारे ४० किलो वॅट प्रतितास ऊर्जा मिळणार आहे. तर सौरऊर्जेतून २० किलो वॅट इंजिनला ऊर्जा पोहोचल्यानंतर ते चालणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत इलेक्ट्रिक जनरेटर सक्रिय होईल. बोटीची क्षमता ६० प्रवाशांना नेण्याची आहे.

सौरऊर्जेवर चालणारी ही अत्याधुनिक बोट असून नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. पणजी-चोडण जलमार्गही चालणार असल्याने पर्यटक तसेच स्थानिकांना सहलीचा आनंद घेता येईल. सध्या चोडण येथे तरंगत्या जेटीसाठी काही साहित्य मागविले असल्याने थोडा विलंब झाला आहे. लवकरच ही सेवा सुरू होईल.

- कॅ. जेम्स ब्रागांझा, बंदर कप्तान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT