Goa Sexual Assault Case Dainik Gomanatk
गोवा

Goa Sexual Assault Case: सोहम नाईक कोलवाळ तुरुंगातून पडला बाहेर; पाचपैकी चार प्रकरणांत जामीन

Soham Naik Released From Jail: कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी सोहम नाईक याच्यावर दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांत जामीन मंजूर झाल्याने त्याची कोलवाळ तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी सोहम नाईक याच्यावर दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांत जामीन मंजूर झाल्याने त्याची कोलवाळ तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री त्याला तुरुंगातून मुक्त करण्यात आले.

त्याचे वकील ॲड. अमेय प्रभूदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रकरणाचा पूर्ण निकाल लागेपर्यंत पॉक्सो न्यायालयाने सोहम नाईकला दक्षिण गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे काही महिन्यांपूर्वी कुडचडेत गदारोळ माजला होता. संशयिताला अटक करावी, अशी मागणी करून लोक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर कुडचडे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

मागाहून हे प्रकरण तपासासाठी क्राइम ब्रँचकडे सोपविण्यात आले होते. सोहमविरोधात एकूण पाच प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यापैकी तीन प्रकरणे बाल न्यायालयासमोर, एक प्रकरण पॉक्सो न्यायालयासमोर, तर एक प्रकरण केपे न्यायालयासमोर वर्ग आहे.

पीडितांकडून असहकार्य

या प्रकरणी सुरुवातीला मोठा गाजावाजा झाला असला, तरी नंतर या प्रकरणातील पीडितांकडून पोलिस तपासात योग्य ते सहकार्य मिळाले नव्हते. चारपैकी तीन प्रकरणांत पीडितांनी न्यायालयात साक्ष देताना आपल्याला हे प्रकरण पुढे न्यायचे नाही, असे आपल्या साक्षीत म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT