curchorem sex scandal case Dainik Gomantak
गोवा

Soham Naik: सोहमच्या जाळ्यात 20 पेक्षा जास्त मुलींचा बळी! ‘स्नॅपचॅट’वरून हेरायचा सावज; अजून नावे पुढे येण्याची शक्यता

Curchorem Sex Scandal: क्राईम ब्रँचने गुरुवारी सोहमच्या घरावर छापा टाकून काही गॅझेट्स जप्त केल्यानंतर ही माहिती बाहेर आली. सोहमच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी आणखी काही मुली पुढे येण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: स्टायलिश राहणीमान आणि आलिशान गाड्या यांची अल्पवयीन मुलींना भुरळ घालून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणारा आणि लैंगिक उपभोग घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करणारा संशयित सोहम नाईक या सावजांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘स्नॅपचॅट’चा प्रामुख्याने वापर करायचा.

क्राईम ब्रँचने गुरुवारी सोहमच्या घरावर छापा टाकून काही गॅझेट्स जप्त केल्यानंतर ही माहिती बाहेर आली. सोहमच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी आणखी काही मुली पुढे येण्याची शक्यता आहे. सोहमच्या वासनेची शिकार झालेल्या बहुतेक मुली १५ ते १७ वयोगटातील असल्या तरी काही मुली १८ आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या लैंगिक छळाला बळी पडलेल्या मुलींची संख्या आतापर्यंत २० वर पोहोचली असून त्यात भर पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या मुली फक्त कुडचडे आणि जवळपासच्याच भागातील नसून गोव्यातील अन्य भागांमधील असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्या वासनेच्या शिकार झालेल्या मुली या १० वीपासून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली असल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रुमिंगवर कायद्याने बंदी हवी

मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांची स्तुती करून आकर्षित करणे, याला ‘ग्रुमिंग’ म्हणतात. सोहम या बाबतीत पटाईत होता. २०२३ पासूनच त्याने हे कारनामे सुरू केले होते. मुलींना ग्रुम करण्यासाठी तो चार-पाच महिने घालवायचा. एकदा ती मुलगी पाशात सापडली, की तो तिचा गैरफायदा घ्यायचा. आवदा व्हिएगस यांच्या मते, अशा ग्रुमिंगमुळे मुली फसतात. त्यामुळे कायद्याने असे ‘ग्रुमिंग’ करणे, हा गुन्हा ठरविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

माहिती लपवून ठेवणे, हाही गुन्हाच

पॉक्सो कायद्यानुसार अल्पवयीनांवर लैंगिक अत्याचार करणे हा गुन्हा आहेच. शिवाय अशा गुन्ह्यात तयार केलेली क्लिप्स व्हायरल करणे, ती डाऊनलोड करणे, मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवणे, हा देखील गुन्हा आहे. एवढेच नव्हे, तर कुणालाही अशा गुन्ह्याची माहिती असेल आणि ती माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली तरी तो गुन्हा असून तो शिक्षापात्र आहे. त्यामुळे कुडचडे लैंगिककांडाची कुणाला माहिती असल्यास ताबडतोब पोलिसांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनेक तरुणींना ओढले मोहजालात

१ सोहम हा केपे सरकारी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. मात्र, तो महाविद्यालयात आपल्या वर्गात बसण्याऐवजी आसपासच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये जाऊन सावजांची टेहळणी करण्यातच सर्व वेळ घालवायचा.

२. कुणी सुंदर मुलगी दिसली, की तिचे नाव मिळवून नंतर इन्स्टाग्रामद्वारे तिच्याशी संपर्क साधायचा. तिच्या सौंदर्याची वारेमाप स्तुती करून तिला आपल्या पाशात ओढायचा. नंतर फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्यांना निर्जनस्थळी न्यायचा आणि लग्नाचे आमिष दाखवत त्यांचा गैरफायदा घ्यायचा.

३ नंतर नको त्या अवस्थेतील चित्रण करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा. सामाजिक कार्यकर्त्या आवदा व्हिएगस यांच्या मते, तो या मुलींशी जास्त करून ‘स्नॅपचॅट’द्वारे संपर्क करायचा.

४ कुठलीही मुलगी सोहमच्या जाळ्यात सापडली की तो त्यांच्या बहिणींची किंवा मैत्रिणीची माहिती मिळवायचा आणि नंतर त्यांनाही आपल्या जाळ्यात ओढायचा. अशा प्रकारे त्याने एका कुटुंबातील दोन बहिणींना तर आणखी एका कुटुंबातील तीन बहिणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा गैरफायदा घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT