So far 2050 patients have been cured in Madgaon Kovid Hospital
So far 2050 patients have been cured in Madgaon Kovid Hospital 
गोवा

मडगाव ‘कोविड’ इस्पितळात आतापर्यंत २०५० रुग्ण बरे

गोमंतक वृत्तसेवा

सासष्टी : गोव्यात कोरोनाग्रस्तांच्या वाढणाऱ्या संख्येवर लक्ष्य केंद्रीत करून सासष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोकांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. दिवसाला १५ ते ३५ कोरोनाग्रस्त रुग्णांना कोविड इस्पितळात दाखल करण्यात येत आहे. कोविड इस्पितळात आतापर्यंत २०४० रुग्ण ठणठणीत बरे झाले असून कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती इएसआय कॉविड इस्पितळ प्रमुख डॉ. विश्वजित फळदेसाई यांनी दिली. 


‘कोरोना’ विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे आरोग्य सुविधा बळकट करण्यात आली आहे. जिल्हा इस्पितळात कोविडचा प्रभाग सुरू करण्यात आलेला आहे. सासष्टी तालुक्यातील ‘इएसआय’ कोविड इस्पितळात २१० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, कोविड चाचणी करण्यासाठी चार मशीन सुरू करण्यात आलेली आहे. सध्या कोविड इस्पितळात १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपाचर करण्यात येत आहे, डॉ विश्वजित फळदेसाई यांनी सांगितले.


‘कोविड’ची चाचणी केलेल्या रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आलेला व्यक्ती धडधाकट असल्यास त्याला होम कॉरन्टाईन होण्यास सांगण्यात येत आहे, तर ज्या रुग्णांना होम कॉरंटाईन होण्यास शक्य नाही त्याला कोविड दक्षता केंद्रात दाखल करण्यात येत आहे. कोलवा निवासीगृह, शिरोडा आरोग्य केंद्र, मडगावमधील दैवज्ञभवन, कळंगुट निवासीगृह ही कोविड दक्षता केंद्र मह्णून घोषित करण्यात आलेली आहे. 


गोव्यात वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येवर लक्ष केंद्रित करून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू करण्यात आले आहे, असे डॉ विश्वजित फळदेसाई यांनी सांगितले.
कॉविड इस्पितळात आतापर्यंत २४०० रुग्ण दाखल झल्याची नोंद असून त्यातील २०५० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर, कॉविड इस्पितळात कोरोनामुळे 188 रुग्णांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलांवर आधी मडगाव कोविड इस्पितळातच उपचार करण्यात येत होते. पण आता गर्भवती महिलांना फोंडा येथील इस्पितळात दाखल करण्यात येत आहे, असे डॉ. विश्वजित फळदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT