उल्हास तुयेकर  Dainik Gomantak
गोवा

..तर मतदारसंघाचा विकास सहज

आ. तुयेकर: रुमडामळ पंचायतीच्या मार्केट कॉम्प्लेक्सचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

सासष्टी: एखाद्या मतदारसंघाचा विकास केवळ आमदारावर अवलंबुन नसतो. तर त्या मतदारसंघातील पंचायतीचे सहकार्य लाभणे तेवढेच महत्वाचे असते, असे प्रतिपादन नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी केले. रुमडामळ पंचायतीने बांधलेल्या मार्केट कॉम्प्लेक्सचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. यावेळी सरपंच, उपसरपंच व सर्व पंच उपस्थित होते.

‘नावेली मतदारसंघातील इतर पंचायत क्षेत्रातही अशा प्रकारचे मार्केट कॉम्प्लेक्स बांधण्यास आपले सदैव सहकार्य लाभेल. मात्र, पंचायतीने त्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. रुमडामळ दवर्ली परिसरात लोकसंख्या वाढलेली आहे. रस्त्यावर काही लोक फळे, भाजी, मासळी वगैरे विकायला बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो’ असे आमदार तुयेकर म्हणाले. हे मार्केट जिल्हा पंचायतीकडून मिळालेल्या 15 लाख रुपये अनुदान खर्चुन बांधण्यात आले आहे. शिवाय आत्मनिर्भर योजने अंतर्गत जो निधी मिळाला त्यातून पंचायतीने कचरा विल्हेवाट मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे, सोलर लाईटची खरेदी केल्याची माहिती देण्यात आली. माजी आमदार लुईझीन फालेरो यांचेही याकामी सहकार्य लाभले याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT