Skin Care Tips  Dainik Gomantak
गोवा

Skin Care Tips: त्वचेची घ्या काळजी; या 5 गोष्टी फॉलो करा!!

गोमन्तक डिजिटल टीम

Skin Care Tips in Marathi

आजकाल धकाधकीचं जीवन एवढं वाढलंय की माणसाला स्वतःकडे बघायला देखील वेळ नाही. आठ तासांचं काम आणि घरची ओढाताण यामुळे घरच्या बाईची नेहमीच प्रचंड तारांबळ उडते, मात्र अशा बिझी शेड्युलमधून काही वेळ स्वतःसाठी जगणं महत्वाचं आहे. स्वतःसाठी जगणं म्हणजे काय तर आपल्या शरीराला काय हवंय याकडे लक्ष देणं.

दिवसभर बाहेर हिंडत फिरत असताना आपल्या चेहऱ्यावर धूळ, माती आणि पल्युशन याचा परिणाम होत असतो. काही कण चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये जातात आणि मग ब्लॅकहेड्स सारख्या चिंता सतावतात.

तुम्हाला माहितीये का नीट झोप न होणं डार्क सर्कल्समधून चेहऱ्यावर अगदी साफ दिसतं. दैनंदिन जीवनाचा ताण-तणाव, चिंता आणि सूर्यप्रकाशामुळे खराब झालेली त्वचा आपला चेहरा अगदी लक्खपणे दाखवत असतो. मग यातून मार्ग काढावा तरी कसा?

मार्ग आहे आणि अगदी सोपा, आपल्या त्वचेची काळजी घेणारा स्किन केअरचा पर्याय. स्किन केअरबद्दल जाणून घेण्याआधी आपण स्किन म्हणजेच त्वचेचे तीन प्रकार जाणून घेऊयात..

त्वचेचे प्रमुख प्रकार कोणते?

माणसाच्या त्वचेचे प्रमुख तीन प्रकार असतात. तेलकट (Oily Skin), कोरडी ( Dry Skin) आणि संवेदनशील त्वचा (Sensitive Skin) सर्वात आधी तुमची त्वचा कोणत्या प्रकारात येते हे तपासून घ्या. एकदा त्वचेचा प्रकार समजला म्हणजे त्यानुसार उपाय करणं सोपं असतं.

आता हे कसं तपासाला?

तुमचा चेहरा स्वछ धुवून घ्या आणि काही वेळानंतर चेहरा कोरडा पडतोय की तेलकट झालाय याचं विश्लेषण करा. इथेच तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता याची माहिती मिळेल.

फक्त स्किन केअरसाठी नाही तर कोणताही मेकअप प्रोडक्त्ट वापरताना आपल्याला त्वचेच्या प्रकारची माहिती असणं गरजेचं असतं कारण एखादवेळेस जर का प्रोडक्त्ट तुमच्या त्वचेला सूट झाला नाही तर यामुळे काही आजार देखील उद्भवू शकतात आणि म्हणूनच सरसकट मेकअपचे प्रॉडक्ट्स वापरू नयेत.

स्किन केअर रुटीन:

१) क्लिनसरचा वापर

स्किन केअर रुटीनची सुरुवात चेहरा स्वछ धुण्यापासून होते. तेलकट त्वचा असलेल्या माणसांनी जेल किंवा फेस येणारा क्लिनसर वापरावा आणि कोरडी त्वचा असलेल्यांसाठी क्रिमी क्लिनसर चांगला ठरतो.

या क्लीनसरने सकाळी उठल्या-उठल्या आणि रात्री झोपताना चेहरा स्वच धुवून घ्यावा. साधारणतः एक मिनिट मसाज केल्याने त्वचेला आराम मिळतो, मात्र या क्लिनसरमध्ये कोणत्याही प्रकारचे अल्कोहॉल असणार नाही याची घबरदारी बाळगावी.

२) सिरम

चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यावर सिरम लावावं. तुमच्या त्वचेला कोणता सिरम चांगला हे देखील तुम्ही तपासून घेऊ शकता. या सिरममध्ये Vitamin E आणि Vitamin C चा समावेश असावा. चेहऱ्याला सूर्यच्या किरणांपासून दूर ठेवण्यासाठी हे सिरम महत्वाचं आहे.

३) मॉइश्च्युरायझर

तिसरी आणि महत्वाची प्रक्रिया म्हणजे मॉइश्च्युरायझर. मॉइश्च्युरायझरच्या वापरामुळे चेहऱ्याला आधार मिळतो, चेहरा राकट झालेला असल्यास त्याला सौम्यपणा यायला मदत होते. सकाळी आणि रात्री स्किन केअर रुटीन पाळत असताना मॉइश्च्युरायझरचा वापर करणं कधीही विसरू नये.

दिवसभराच्या धावपळीत थकलेल्या चेहऱ्याला आरामाची गरज असते आणि म्हणूनच मॉइश्च्युरायझरचा वापर करावा. तुमची त्वचा तेलकट असेल तर लाईट मॉइश्च्युरायझरचा वापर करावा आणि कोरडा चेहरा असल्यास थोडा दाट मॉइश्च्युरायझर वापरता येतो.

४) सनस्क्रिन

चौथी आणि महत्वाची पायरी म्हणजे सनस्क्रिन. दिवसभर आपला चेहरा सूर्यप्रकाशात वावरत असतो आणि म्हणूनच त्याला संरक्षणाची गरज असते. UV Rays थेट चेहऱ्यावर येऊन लागल्यास चेहरा काळपट पडतो आणि कधीकधी रॅशेस देखील होऊ शकतात, म्हणूनच घराबाहेर पडताना सनस्क्रिनचा वापर केलाच पाहिजे.

खरंतर फक्त चेहराच नाही तर शरीराचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतो त्याला सनस्क्रिन प्रोटेक्शनची गरज असते. SPF 30-50 मधली जी सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य आहे तिचा वापर करावा, मात्र संवेदनशील त्वचा असल्यास केमिक्लसपेक्षा मिनरल्स असलेली सनस्क्रीन वापरणं कधीही चांगलं.

५) रेटिनॉइड्स

चेहऱ्याला Vitamin A ची पोषक तत्वे देण्याचं काम रेटिनॉइड्स करतात, मात्र याचा वापर करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्या. रात्री झोपताना जर का तुम्ही रेटिनॉइड्सचा वापर करणार असाल तर तो एक दिवसाआड असावा.

आपलं शरीर नेहमीच आपल्यासाठी झटत असतं आणि म्हणूनच कितीही वेळ कमी असला तरीही निदान सकाळची सुरुवात आणि रात्री झोपण्यापूर्वी शरीराची किमान काळजी घेतली गेली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

Mhadei River Dispute: कर्नाटकाने असं पळवलं पाणी, गोव्यातील वकिलांची फौज करते काय?

'काही वेळा काय करावे हेच समजत नाही'; प्रशिक्षक मार्केझनी FC Goaच्या असमाधानकारक कामगिरीची जबाबदारी स्वीकारली

Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

SCROLL FOR NEXT